Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Grand Tour: पुणे ग्रँड टूरच्या दुसऱ्या पर्वासाठी ९०० कोटींची तरतूद

रस्त्यांच्या कामांसह जिल्ह्यातील जैवपर्यटन स्थळांच्या विकासालाही प्राधान्य देण्यात आले आहे. यासाठी १४ ठिकाणांची निवड करण्यात आली असून त्यांचा विकास वन विभागामार्फत करण्यात येणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 19, 2026 | 02:35 AM
Pune Grand Tour: पुणे ग्रँड टूरच्या दुसऱ्या पर्वासाठी ९०० कोटींची तरतूद
Follow Us
Follow Us:
  • पुणे ग्रँड टूरच्या दुसऱ्या पर्वासाठी ९०० कोटींची तरतूद
  • ३३१ गावे राज्य व राष्ट्रीय महामार्गांशी जोडली जाणार
  • नोव्हेंबरअखेर कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट
पुणे: पुणे ग्रँड टूरच्या दुसऱ्या पर्वानिमित्त जिल्ह्यातील ६६२ किलोमीटर रस्त्यांचे नव्याने बांधकाम करण्यात येणार असून त्यासाठी सुमारे ९०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. पहिल्या पर्वासाठी ४३७ किलोमीटर रस्त्यांची कामे पूर्ण झाली होती. त्यामुळे दोन्ही पर्वांमधून एकूण सुमारे १,१०० किलोमीटर रस्त्यांचे जाळे उभारले जाणार आहे. यामुळे ग्रामीण भागाचा शहराशी संपर्क वाढण्याबरोबरच पर्यटनाला चालना मिळणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

डुडी म्हणाले, “पुणे ग्रँड टूरच्या पहिल्या पर्वासाठी आठ तालुक्यांमध्ये ४३७ किलोमीटर रस्ते विकसित करण्यात आले होते. आता दुसऱ्या पर्वात ११ तालुक्यांतील एकूण १,०९९ किलोमीटर रस्त्यांचा समावेश करण्यात आला असून त्यापैकी ६६२ किलोमीटर रस्त्यांचे नव्याने बांधकाम होणार आहे.”

या कामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ३६२ कोटी रुपये, पीएमआरडीएकडून २४० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. याशिवाय पुणे महापालिका हद्दीतील ८५ किलोमीटर आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील ३५ किलोमीटर रस्त्यांचेही नूतनीकरण करण्यात येणार आहे. तांत्रिक अडचणींमुळे काही रस्त्यांची कामे करता न आल्यास जिल्हा नियोजन समितीमार्फत ४० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या रस्त्यांच्या कामांसाठी महिनाअखेर निविदा प्रक्रिया पूर्ण करून जुलैमध्ये प्रत्यक्ष कामांना सुरुवात केली जाणार आहे. नोव्हेंबरअखेर सर्व कामे पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत.

Pune Grand Tour 2026: प्रदूषणमुक्तीसाठी पुण्याचे मोठे पाऊल; ‘प्रोलॉग’ रेसने सायकलिंग स्पर्धेचा दिमाखदार प्रारंभ

पर्यटनाला चालना देणारे नवे मार्ग

दुसऱ्या पर्वासाठी जुन्नर–राजगुरुनगर आणि आळंदी–लोणावळा हे दोन नवे मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. या मार्गांमुळे नैसर्गिक आणि धार्मिक पर्यटनस्थळांना जोडणी मिळणार आहे. नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या खेड, आंबेगाव आणि जुन्नर या आदिवासी पट्ट्यातील तालुक्यांनाही या प्रकल्पाचा लाभ होणार आहे. रस्त्यांची उभारणी केवळ स्पर्धेच्या मार्गापुरती मर्यादित न राहता गावांना थेट राज्य व राष्ट्रीय महामार्गांशी जोडण्यावर भर दिला जाणार आहे. पहिल्या पर्वात १४८ गावांना नव्या रस्त्यांची सुविधा मिळाली होती, तर दुसऱ्या पर्वानंतर एकूण ३३१ गावे या रस्ते जाळ्याशी जोडली जाणार आहेत.

जैवपर्यटन स्थळांचाही विकास

रस्त्यांच्या कामांसह जिल्ह्यातील जैवपर्यटन स्थळांच्या विकासालाही प्राधान्य देण्यात आले आहे. यासाठी १४ ठिकाणांची निवड करण्यात आली असून त्यांचा विकास वन विभागामार्फत करण्यात येणार आहे.

खोदाई झालेले रस्ते पुन्हा दुरुस्त होणार

पहिल्या पर्वासाठी पुणे शहरात विकसित करण्यात आलेल्या काही रस्त्यांची विविध कामांसाठी खोदाई करण्यात आली आहे. संबंधित कंत्राटदारांकडून हे रस्ते पुन्हा पूर्ववत करून घेतले जाणार आहेत. तसेच दुसऱ्या पर्वातील मार्गांवर दूरध्वनी, गॅस, वीज, पाणीपुरवठा आणि ऑप्टिकल फायबर यांसाठी आवश्यक केबल व डक्ट टाकण्याची कामे सप्टेंबरपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत.

Pune Grand Tour 2026: आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचा बारामतीकरांना थरारक अनुभव; ऑस्ट्रेलियाच्या स्कॉटने मारली बाजी

स्पर्धेला उन्नत मानांकन

गतवर्षीच्या स्पर्धेला आंतरराष्ट्रीय सायकलिंग महासंघाने (UCI) २.२ मानांकन दिले होते. या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण २० देशांमध्ये झाले असून तब्बल ६१ कोटी प्रेक्षकांनी ते पाहिले होते. यंदा स्पर्धेचे मानांकन वाढवून २.१ करण्यात आले असून त्यामुळे आंतरखंडीय सायकलपटूंनाही स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.

Web Title: Allocation of 900 crore for the second phase of the pune grand tour

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • pune news
  • Road Work
  • tourism

संबंधित बातम्या

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक
1

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक

सणासुदीच्या मुहूर्तावर नारळाला मागणी वाढली; मागणी वाढताच दरही कडाडले
2

सणासुदीच्या मुहूर्तावर नारळाला मागणी वाढली; मागणी वाढताच दरही कडाडले

Pune News : रिंगरोडचे अर्ध्याहून अधिक काम पूर्ण; पायाभूत सुविधांच्या विस्तारातील महत्त्वाचा प्रकल्प
3

Pune News : रिंगरोडचे अर्ध्याहून अधिक काम पूर्ण; पायाभूत सुविधांच्या विस्तारातील महत्त्वाचा प्रकल्प

जवळ झोपण्यास पत्नीने नकार दिल्याने पती संतप्त; चाकूने सपासप वार केले अन् मध्यस्थी करणाऱ्या मुलीलाही…
4

जवळ झोपण्यास पत्नीने नकार दिल्याने पती संतप्त; चाकूने सपासप वार केले अन् मध्यस्थी करणाऱ्या मुलीलाही…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.