Mahatma Phule Jayanti: आज 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जयंतीचा दिवस... या दिवशी महात्मा फुलेंचे स्मरण करून त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला जातो. देशात महिलांची पहिली शाळा उभारण्यापासून ते अस्पृशांना न्याय मिळवून देण्यापर्यंत त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक मोलाची कामे केली, ज्यांचे आजही स्मरण केले जाते. महात्मा फुले हे एक थोर समाजसुधारक, विचारवंत, लेखक, शिक्षक आणि क्रांतिकारी कार्यकर्ते होते. महात्मा फुलेंच्या या 197 व्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन! चला यानिमित्त त्यांच्या जीवनकार्यावर जरा प्रकाश टाकूयात.
Mahatma Phule, Mahatma Phule Articles
1827-1841 - महात्मा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी पुणे येथे झाला. 1840 साली वयाच्या तेराव्या वर्षी जोतीबांचा विवाह सावित्रीबाई फुले यांच्याशी झाला. 1841 साली माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला
1848-1855 - मुलींची पहिली शाळा उभारण्यात महात्मा फुलेंचे मोठे योगदान, त्यांनी आपल्या पत्नीसह 1848 साली पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरु केली. ती बंद पडल्यांनंतर पुन्हा 1852 मध्ये त्यांनी पुन्हा शाळेची नव्याने सुरुवात केली. पुढे 1855 मध्ये त्यांनी 'तृतीय रत्न' हे मराठी नाटक लिहिले. याच साली त्यांनी कामगार आणि गरजूंची रात्रीची शाळा सुरु केली
1863-1868 - साल 1863 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी अवैध मुलांसाठी अनाथाश्रम सुरू केले. याच्या पुढच्याच वर्षी म्हणजे 1864 साली फुलेंनी शेणवी जातीच्या विधुरांचा पहिला पुनर्विवाह घडवून आणला. यानंतर 1868 मध्ये त्यांनी दुष्काळाच्या काळात अस्पृशांना पाणी मिळावं म्हणून वाड्यातील आड खुला करून दिला. याच साली त्यांनी शिवजयंती उत्सावाचीही सुरुवात केली
1869-1873 - महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1869 मध्ये मराठीत शिवचरित्र (पोवाडा रूपी) लिहून प्रकाशित केले. पुढे 1873 साली ज्योतिबा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.
1883-1890 - 1883 साली महात्मा फुलेंनी 'शेतकऱ्यांचा आसूड' हे या ग्रंथाचे लिखाण केले. यात त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. साल 1888 मध्ये मुंबईतील कोळीवाड्यात त्यांचा 'महात्मा' या पदवीने गौरव करण्यात आला. त्यांच्या या जीवनप्रवासाचा शेवट 1890 साली झाला, जेव्हा त्यांचे पुणे येथे निधन झाले