साहित्य :
कृती :
प्रथम गव्हाचे पीठ, बेसन आणि रवा वेगवेगळे खमंग भाजून घ्यावे. त्यांना सोनेरी रंग येईपर्यंत भाजावे. ताटात काढून थंड होऊ द्यावे. त्यानंतर दूध पावडर छान मिक्स करावी. नंतर त्यात दूध मिक्स करावे.
सर्व मिश्रण एका डब्यात भरून कुकरमध्ये ठेवावे. तीन शिट्ट्या होऊ द्याव्यात. दूध पावडरच्या ऐवजी मावा किंवा दुधावरची सायपण टाकू शकता. घट्ट साय टाकल्यास चार चमचे दुध टाकण्याची गरज नाही. नंतर ताटात काढून हाताने गुठल्या तोडून चाळावे. त्यात वेलची पूड, हवे असल्यास डॉयफ्रूटचे काप टाकावेत. गुळ किसुन टाकावा. सर्व मिश्रण एकजीव करून घ्या. त्यात अर्धी वाटी पातळ तूप मिसळावे. लाडू वळले जात नसतील तर आणखी थोडे तूप घालावे. त्यानंतर छान गोल आकाराचा लाडू वळून त्यावर पिस्ताचे काप लावावेत.