Iran War: इराणचा 'विनाश' अटळ? सौदी, पाकिस्तान आणि अझरबैजान एकत्र! इस्रायलच्या मदतीला धावले ३ इस्लामिक देश; मध्यपूर्वेत महायुद्धाचा भडका! ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Saudi Pakistan Azerbaijan alliance against Iran : मध्यपूर्वेतील युद्धाने (US-Israel Iran War) आता एक अत्यंत अनपेक्षित आणि धोकादायक वळण घेतले आहे. ज्या इराणने इस्रायल आणि अमेरिकेविरुद्ध रणशिंग फुंकले होते, तोच इराण आता आपल्या शेजारील इस्लामिक देशांच्या कचाट्यात सापडण्याची चिन्हे आहेत. सौदी अरेबिया, पाकिस्तान आणि अझरबैजान हे तीन देश इराणविरुद्ध एक संयुक्त आघाडी उघडण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त समोर येत आहे. जर ही युती प्रत्यक्षात आली, तर इराणला अशा युद्धाचा सामना करावा लागेल ज्यातून बाहेर पडणे त्याला अशक्य होईल.
या सर्व घडामोडींच्या केंद्रस्थानी सौदी अरेबिया आणि पाकिस्तान यांच्यातील सप्टेंबर २०२५ चा ऐतिहासिक ‘धोरणात्मक संरक्षण करार’ आहे. या करारानुसार, एका देशावर झालेला हल्ला हा दुसऱ्यावरचा हल्ला मानला जाईल. अलीकडेच इराणने सौदीच्या तेल प्रकल्पांवर आणि रियाधवर क्षेपणास्त्र हल्ले केल्याने सौदी राजघराण्यात भीतीचे वातावरण आहे. सौदीचे संरक्षण मंत्री खालिद बिन सलमान यांनी तातडीने रावळपिंडी गाठून पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांची भेट घेतली. सौदीला आता स्वतःच्या सुरक्षेसाठी पाकिस्तानी सैन्याची मदत हवी आहे आणि पाकिस्तान या कराराला बांधील असल्याचे संकेत परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी दिले आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : WorldWar3: ‘यहूदी राजवटीने मोठी चूक केली’ अयातुल्ला खामेनी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्याच ‘X’ अकाउंटवरून इस्रायलसाठी स्फोटक धमकी
इराणच्या उत्तरेला असलेला अझरबैजान हा देश आधीच इराणच्या रडारवर आहे. अझरबैजानचे इस्रायलशी असलेले घनिष्ठ संरक्षण संबंध इराणला खुपत आहेत. अलीकडेच इराणने अझरबैजानच्या नखचिवान विमानतळावर ड्रोन हल्ला केला, ज्याचा बदला घेण्याचा इशारा अझरबैजानने दिला आहे. इस्रायलकडून मिळणारी प्रगत शस्त्रे आणि अमेरिकेचा पाठिंबा यामुळे अझरबैजान इराणविरुद्ध उत्तरेकडून मोर्चा उघडण्यासाठी सज्ज आहे.
🇵🇰🇸🇦 Pakistan Confirms Defense Ties With Saudi Arabia Amid Regional Tensions: Pakistan’s Foreign Minister Ishaq Dar said the country has a strategic mutual defense agreement with Saudi Arabia and has assured Iran that its soil will not be used for attacks, noting limited… pic.twitter.com/brnZQEquF8 — NOVEXA (@Novexa24) March 3, 2026
credit – social media and Twitter
जर या तीन देशांनी एकत्रित हल्ला केला, तर इराणचा नकाशा बदलू शकतो. उत्तरेकडून अझरबैजान, पूर्वेकडून पाकिस्तान आणि नैऋत्येकडून सौदी अरेबिया इराणवर जमिनीवरून हल्ले करू शकतात. सध्या अमेरिका आणि इस्रायल केवळ हवाई हल्ले करत आहेत, परंतु पाकिस्तान आणि अझरबैजानचे सैन्य प्रत्यक्ष जमिनीवर उतरून इराणची क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणा खिळखिळी करू शकते. याशिवाय, पर्शियन आखात आणि अरबी समुद्रात इराणची नौदलाची नाकेबंदी करून त्याची पुरवठा साखळी तोडली जाऊ शकते.
Met with Pakistan’s Chief of Army Staff and Chief of Defense Forces, Field Marshal Asim Munir. We discussed Iranian attacks on the Kingdom and the measures needed to halt them within the framework of our Joint Strategic Defense Agreement. We stressed that such actions undermine… pic.twitter.com/OuELnf9LU6 — Khalid bin Salman خالد بن سلمان (@kbsalsaud) March 7, 2026
credit – social media and Twitter
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Oil Prices: ‘बाजारात तेल हवं, मग भारताला साथ द्या!’अमेरिकेच्या दुटप्पी पण ‘फायदेशीर’ निर्णयाने जग अवाक; ‘या’ विधानामुळे स्पष्टता
पाकिस्तानची आर्थिक स्थिती पाहता, या युद्धात सामील होणे त्यांच्यासाठी एक फायदेशीर सौदा ठरू शकतो. सौदी अरेबिया आणि अमेरिकेकडून मिळणाऱ्या अब्जावधी डॉलर्सच्या मदतीसाठी पाकिस्तान आपले ‘इस्लामिक बंधुत्व’ बाजूला सारून इराणविरुद्ध शस्त्र उचलू शकतो. अंतर्गत बंडखोरी आणि अयातुल्ला खामेनी यांच्या निधनानंतरची अस्थिरता यामुळे इराण आधीच कमकुवत झाला आहे. अशा परिस्थितीत बहु-आघाडी युद्ध इराणला सीरिया किंवा इराकसारख्या भीषण मानवतावादी संकटात लोटू शकते.
Ans: इराणने सौदीच्या तेल प्रकल्पांवर आणि अझरबैजानच्या विमानतळावर केलेले हल्ले, तसेच पाकिस्तानशी असलेला संरक्षण करार यामुळे हे तीन देश इराणच्या आक्रमकतेला रोखण्यासाठी एकत्र येत आहेत.
Ans: इराणला एकाच वेळी उत्तर, पूर्व आणि समुद्र अशा तीनही बाजूंनी युद्धाला सामोरे जावे लागेल, ज्यामुळे त्याची संरक्षण यंत्रणा कोलमडू शकते.
Ans: होय, पाकिस्तानच्या कोसळलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी सौदी आणि अमेरिकेकडून मिळणारी मोठी आर्थिक मदत (डॉलर्स) हे युद्धात सामील होण्याचे मुख्य प्रेरणास्थान असू शकते.






