डोंबिवली : डोंबिवलीतून (Dombivali) असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग (Minor Girl Molested ) करण्यात आला आहे. या मुलीनं घडलेला प्रकार आपल्या पालकांना सांगितलं. कुटुंबातले लोक पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. पोलिसांत तक्रार देण्यात आली. त्यानंतर आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्हीची (Man Arrested With The Help Of CCTV Footage) मदत घेतली.
एका विकृत तरुणाला डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी (Manpada Police) सीसीटीव्हीच्या मदतीने अटक केली. या तरुणानंं एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला होता. अमन यादव असं अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. तो प्रयागराग विद्यापीठाचा विद्यार्थी आहे. दरम्यान, विनयभंग करणाऱ्या या विकृत तरुणाने आणखीन किती मुलींसोबत असा प्रकार केला आहे, याचा तपास आत्ता पोलीस करीत आहेत. या आरोपीला शोधण्यासाठी तब्बल ३२०० बाईकचा तपास केला आहे.
डोंबिवलीच्या एका हाय प्रोफाईल परिसरात एक लहान मुलगी आपल्या इमारतीच्या जिन्यातून खाली उतरत होती. तेव्हा तिला एका तरुणाने स्पर्श केला. मात्र या मुलीला लक्षात आला की, त्या व्यक्तीने मला ‘बॅड’ टच केलाय. मुलगी घाबरली. घरात गेली. मुलीने हा प्रकार तिच्या घरच्या मंडळींना सांगितला. घरातील लोक त्या तरुणाला पकडण्यासाठी घराबाहेर पडले. तोपर्यंत तो पसार झाला होता.
ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. टोपी घातलेली असल्यानं आरोपी स्पष्ट दिसून येत नव्हता. हे प्रकरण मानपाडा पोलीस ठाण्यात पोहचले. एसीपी जे. डी. मोरे आणि सीनिअर पीआय शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी अविनाश वनवे यांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. परिसरातील सर्व सीसीटीव्ही पोलिसानी चेक केले. इतकेच नाही तर एके ठिकाणी तोच तरुण काही खेळणाऱ्या मुलांना लक्ष्य करण्यासाठी आला असता त्याची ब्लॅक कलरची युनिकॉन बाईक सीसीटीव्हीत कैद झाली.
अविनाश वनवे यांच्या पथकाने आधी ही माहिती काढली की, डोंबिवलीत किती जणांकडे युनिकॉन बाईक आहेत. आरटीओकडून सांगण्यात आले की, दहा हजार जणांकडे अशा प्रकारची बाईक असल्याची नोंद आहे. त्यामध्ये ब्लॅक कलरची बाईक ३२०० आहेत. त्यापैकी सोनारपाडा परिसरात ८० जणांकडे ही बाईक आहे. मात्र कोणत्या ब्लॅक कलरच्या युनिकॉन गाडीचे इंडिकेटर तुटले आहे, हे कळायला मार्ग नव्हता. अखेर पोलिसांनी मोठ्या शिताफीनं इंडिकेटर तुटलेली एक गाडी शोधून काढली. ती गाडी अमन यादवची होती. पोलिसांनी अमन यादव याला ताब्यात घेतले.
अमन यादवला ताब्यात घेतल्यानंतर धक्कादायक प्रकार समोर आला. अमन यादव हा प्रयागराज विद्यापीठातील विद्यार्थी आहे. तो सध्या सोनारपाडा येथील आई वडिलांकडे आला होता. दोन ठिकाणच्या सीसीटीव्हीत तो कैद झाला. मात्र त्याने अन्य किती मुलींसोबत हा प्रकार केला असावा याची माहिती नाही. कारण तक्रार पोलिसांकडे नाही. त्याचीही विकृती पाहून दिसून येते की, त्याने अनेक मुलींसोबत हा प्रकार केला असावा, असा संशय व्यक्त केला जातो आहे.