File Photo : Rain News
गेल्या आठवड्यापासून राज्यभरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.पाऊस राज्यातील विविध भागात हजेरी लावताना दिसून येत आहे. दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. २५ ऑगस्टपर्यंत राज्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे. ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी राज्यात २६ ते ३० ऑगस्ट या कालावधीत उष्णतेचा पारा वाढणार असल्याचे सांगितले. तर ३१ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या कालावधीत राज्यात पुन्हा पाऊस कमबॅक करण्याची शक्यता आहे.
दरम्यान २५ ऑगस्टपर्यंत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अंदाजे उद्या धुळे, जळगाव, पुणे, सातारा, कोल्हापूर, मुंबई, ठाणे या जिल्ह्यात तसेच अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. तर २६ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट या कालावधीत राज्यात उष्णतेचा पारा वाढणार असल्याची शक्यता देण्यात आली आहे. तर पुढील दोन दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासन आणि सरकारकडून करण्यात आले आहे. यंदा राज्यातील सर्व भागात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.
३१ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या कालावधीत राज्यात पुन्हा एकदा मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे,. राज्यात अनुकूल परिस्थिती असल्याने २५ ऑगस्टपासून मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होण्याची शक्यता आहे. मुंबई आणि पुणे शहराला पुढील तीन दिवसांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात देखील मुसळधार पाऊस होत आहे. मध्यंतरी विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावल्याने राज्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होताना दिसत आहे. ही राज्यासाठी सुखकारक बाब आहे.