सौजन्य - सोशल मिडीया
इंदापूर : माझ्या लाडक्या बहिणींनो तुमचा सख्खा मामा तुमच्याबरोबर आहेच, पण हा भरणे मामाही तुमच्या बरोबर आहे. बहिणींना हा भाऊ काही कमी पडू देणार नाही. असे आश्वासन आमदार दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर येथे बोलताना महिला भगिनींना केले. गुरुवारी (दिनांक २९) इंदापूर शहरात आपली नाती, आपली माणसं ग्रुपच्या माध्यमातून सामूहिक रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.
आमदार भरणे म्हणाले की,निवडणूक आली की, काही लोकं नमस्कार करतात, परंतु मी असे कधी केले नाही. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर दुसऱ्या दिवसापासूनच मी पाचही वर्ष भिंगरी सारखं फिरतो, गोरगरीब लोकांमध्ये जातो. त्यांचे दुखणे आणि अडचणी समजून घेतो. त्यांची सर्वच कामे मी करेन असे म्हणत नाही. परंतु जी कामे माझ्याकडून होणे शक्य आहेत ती प्रामाणिकपणे करून सेवा करण्याचा प्रयत्न करतो. मी कधीही जाती-पातीचा, गटा-तटाचा आणि पक्षाचा विचार करत नाही. असे त्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी आपली नाती, आपली माणसं परीवाराच्या वतीने आमदार भरणे यांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
आपली नाती, आपली माणसं ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष महादेव लोंढे, भिमराव शिंदे, तालुकाध्यक्ष जयवंत शिंदे, सचिव नामदेव सोनवणे, निरीक्षक बाळासाहेब डफळ, महिला तालुका समन्वयक कलावती करे, मनीषा माने, शैला लोंढे, अंजुमन सय्यद, धनश्री धालपे, सुजाता भारती, उज्वला पवार, ज्योती भोरे, दमयंती जानकर, नंदिनी रणधीर, निता चव्हाण, मंदा सावंत, बाई चोरमले, नंदा भोसले, सुनीता घोगरे, ज्योती भोरे, संगीता केसकर यांच्यासह मोठ्या संख्येने महिला यावेळी उपस्थित होत्या. दरम्यान,प्रगतशील बागायतदार उद्योजक काळे यांनी उपस्थित १ हजार महिलांना साड्यांचे वाटप केले.