हिंदू धर्मात, आषाढ महिन्याला फार महत्त्व आहे. या महिन्यापासूनच पावसाची सुरवात होऊ लागते. तसेच या महिन्यात विठूरायाची वारी सुरु असते. या महिन्याला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. हिंदू पंचांगातील पवित्र महिन्यांपैकी हा महिला एक आहे.
नवजात मुलींची गोंडस नावे
आज आम्ही तुम्हाला आषाढ महिन्यात जन्मलेल्या नवजात मुलींसाठीची काही खास आणि गोड नावे सांगत आहोत
फाल्गुनी - आषाढ महिन्यात तुमच्या घरी क्युट मुलीचे आगमन झाले असेल तर तिचे नाव तुम्ही फाल्गुनी ठेवू शकता. पौर्णिमेचा दिवस असा या नावाचा अर्थ आहे.
अमाया - तुम्हाला तुमच्या मुलीसाठी एक युनिक नाव हवे असल्यास तुम्ही अमाया या नावाची निवड करू शकता. या नावाचा अर्थ होतो रात्रीचा पाऊस.
सरी - छोटेसे आणि क्युट नाव हवे असल्यास तुम्ही तुमच्या चिमुकलीचे सरी नाव ठेवू शकता. या नावाचा अर्थ पाऊस असा होतो.
भूमी - भूमी या नावाचा अर्थ पृथ्वीचा पाया असा आहे. हे नाव इतरांपेक्षा फार वेगळे आणि काही तरी नवीन असे आहे.
दक्षथा - दक्षथा हे नावदेखील तुमच्या नवजात मुलींसाठी एक चांगला पर्याय आहे. हे नाव शिवाची पत्नीचे आहे.