बचावलेल्या बिबट्यांची तपासणी बंधनकारक! वन्यप्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याच्या वन मंत्री गणेश नाईकांच्या सूचना
झोपडीधारकांना मध्य रेल्वेची नोटिस, लवकच राबविण्यात येणार अतिक्रमण हटाव मोहीम! जाणून घ्या सविस्तर
साध्ययापूर्वी कराधिया रस प्रक्रिया करून बिबट्याला सोडण्यात आले. त्याचे ट्रेकिंग देखील सुरु होते. गेल्या दोन महिन्याच्या कालावधीत तो शिकार करत असल्याचे हि दिसून आले होते. मात्र दोन फेब्रुवारी रोजी या बिबट्याची हालचाल रेडिओ कॉलर वरून नमूद न झाल्याचे समजले, त्या ठिकाणी जाऊन पाहिल्यावर तो मृत असल्याचे समजले.’ – अनिता पाटील, संचालिका, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (फोटो सौजन्य – Pinterest)
वन मंत्री गणेश नाईक यांनी सूचना दिल्या आहेत की, वन्यप्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांचे ट्रॅकिंग करणे आवश्यक असल्याचा मुद्दा महत्वाचा आहे. बचावलेल्या बिबट्यांची तपासणी बंधनकारक करण्यात आली आहे.
Mumbai Mayor : अखेर भाजपकडून महापौरपदाची घोषणा, तर उपमहापौर शिवसेनेचे संजय घाडी
बिबट्या पूर्णपणे तंदुरुस्त आढळल्यासच त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येत असल्याचे अनिता पाटील म्हणाल्या, बिबट्याच्या मृत्यूच्या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात असून, वनविभागाने अधिक दक्षता घेण्यास सुरुवात केली आहे. भविष्यात मानव-वन्यप्राणी संघर्ष टाळण्यासाठी बचाव केलेल्या बिबट्यांवर रेडिओ कॉलर बसवणे, त्यांच्या हालचालींचे निरीक्षण करणे आणि संवेदनशील भागांमध्ये गस्त वाढवणे अशा उपाययोजना राबवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. वनविभागाकडून बिबट्याच्या मृत्यूच्या कारणांचा तपास सुरू असून, अहवालानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता कोणत्याही संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.






