आई(Mother) मुलांसाठी कोणतीही अवघड गोष्ट करायला तयार असते. मात्र रशियामधील एका २५ वर्षीय कठोर ह्रदयाच्या महिलेने आपल्या मुलांसाठी जे केले ते धक्कादायक आहे. मित्रांसोबत दारू पार्टी (Mother went for party and left children at home)करण्यासाठी निर्दयी महिलेने ११ महिन्यांचा मुलगा आणि तीन वर्षाचा मुलीला घरात एका खोलीत बंद केले. चार दिवसांपासून भुकेने व्याकूळ असलेल्या मुलाचा अखेर पाळण्यातचं मृत्यू(baby died at home) झाला. मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात कोर्टाने महिलेला दोषी ठरवले आहे.
[read_also content=”रेल्वे स्टेशनच्या पुलावर झोपलेल्या माणसाची तो पळवत होता बॅग, पोलिसांनी आवळल्या मुसक्या – बॅगेसह २ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त https://www.navarashtra.com/latest-news/bag-thieve-arrested-by-dadar-police-nrsr-141506.html”]
रशियाच्या झ्लाटॉस्टमधील २५ वर्षीय महिला ओल्गा बजरोवा आपल्या पतीपासून वेगळी राहते. मित्रांसह दारू पार्टी करण्यासाठी ओल्गाने आपल्या निर्दोष मुलांना मृत्यूच्या दारात ढकलले. ती आपला ११ महिन्यांचा मुलगा सेवली आणि ३ वर्षांचा मुलीला घरातच बंद ठेवून पार्टीला गेली. चार दिवस दोन्ही मुलं घरात बंद होती.
यादरम्यान, ओल्गाने मुलांच्या स्थितीबाबत कोणतीही माहिती घेतली नाही.
जेव्हा ती पार्टी करून घरी परत आली तेव्हा तिचा ११ महिन्यांचा मुलगा भूक आणि तहानने मरण पावला. तसेच ३ वर्षांची मुलगीही खूपच थकलेली आणि भयभीत होती. घरी जाताना ओल्गाने मुलांच्या आजीशी संपर्क साधला होता. मुलांची आजी जेव्हा घरी पोहचली तेव्हा तिने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी ओल्गाला अटक केली, मुलीला रुग्णालयात दाखल केले.
रशियातील ज्लाटौस्ट zlatoust शहरात खटल्याच्या वेळी एका कोर्टाने ओल्गा बजरोवावर अल्पवयीन मुलाच्या हत्येसाठी अत्यंत क्रौर्य केल्याचा आरोप केला. तसेच आपल्या मुलीला अत्यंत धोकादायक परिस्थितीत सोडल्यामुळे आईचे कर्तव्य बजाविण्यात अपयशी ठरल्यामुळे दोषी ठरवले.