औरंगाबाद : खासदार इम्तियाज जलील(Imtiyaj Jaleel) यांनी राज्यातील कोरोना निवारणाच्या उपाययोजनांकरिता राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांच्या मे २०२१ च्या वेतनातील एक / दोन दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये(CM Fund) देणगी म्हणून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यातून अहोरात्र सेवा देणाऱ्या पोलीस कर्मचारी, आरोग्य कर्मचारी तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांना वगळुन शासनातर्फे त्यांना उत्तेजनार्थ / विशेष वाढीव वेतन देण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thakre) आणि उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना दिलेल्या पत्रात खासदार इम्तियाज जलील यांनी नमुद केले की, राज्यात आपत्ती निवारणाच्या उपाय योजनांकरिता राज्यातील सर्व भा.प्र.से., भा.पो.से., भा.व.से. व महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकिय अधिकारी / कर्मचारी यांच्या माहे मे २०२१ च्या वेतनातील एक / दोन दिवसांचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये देणगी म्हणून उपलब्ध करुन देण्याबाबत दिनांक ७ मे २०२१ रोजी शासन निर्णय काढण्यात आला होता त्याचे मी स्वागतच करतो.
[read_also content=”हवामान खात्याने दिला चक्रीवादळाचा इशारा, किनारपट्टीच्या भागात हाय अलर्ट जारी https://www.navarashtra.com/latest-news/hurricane-warning-by-weather-department-beach-area-on-high-alert-nrsr-127339.html”]
ते पुढे लिहीतात की, या शासन निर्णयामधून पोलीस कर्मचारी, आरोग्य कर्मचारी तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांना वगळण्यात यावे. कारण पोलीस कर्मचारी व आरोग्य कर्मचारी यांनी या कोरोना कोविड – १९ च्या कालावधीमध्ये मेहनत तर घेतलीच आहे. परंतु त्यांना पाच दिवसांचा आठवडा नसुन पुर्ण सप्ताह काम करायला लावले जात आहे. पोलीस व आरोग्य कर्मचाऱ्यांना उलट शासनाने कोविड योध्दा म्हणून उत्तेजनार्थ / विशेष वाढीव वेतन दिले पाहिजे, असे खासदार इम्तियाज जलील यांनी दिलेल्या पत्रात नमुद केले आहे.
खासदार इम्तियाज जलील यांनी पोलीस कर्मचारी, आरोग्य कर्मचारी व चतुर्थश्रेणी कर्मचारी यांची वेतन कपात करण्यात येवू नये त्याकरिता स्वतंत्र परिपत्रक काढण्याची मागणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री यांच्याकडे केली आहे.