बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव(Lalu Prasad Yadav) यांच्या विरोधातल्या भ्रष्टाचार प्रकरणाचा(Corruption Case) २०१८ पासून सुरु असलेला प्राथमिक तपास सध्या सीबीआयने(CBI) थांबवला आहे. कोणताही ठोस पुरावा न मिळाल्याने हा तपास थांबवण्यात आला आहे.
[read_also content=”रायगडमधल्या समुद्रकिनाऱ्यांवर सापडले ५ मृतदेह, बार्ज पी – ३०५ मधील बेपत्ता खलाशी असल्याचा संशय https://www.navarashtra.com/latest-news/5-dead-bodies-found-at-beaches-of-raigad-district-may-be-these-are-the-bodies-of-barge-p-305-sailor-nrsr-132584.html”]
लालू प्रसाद यांचा मुलगा तेजस्वी आणि मुली चंदा आणि रागिणी यांच्यावर २०११ मध्ये चार लाख रुपयांमध्ये एबी एक्स्पोर्ट्स ही कंपनी खरेदी केल्याचा आरोप होता. या एबी एक्स्पोर्ट्सने दिल्लीतल्या न्यू फ्रेंड्स कॉलनीमध्ये पाच कोटी रुपयांची प्रॉपर्टी खरेदी केली होती. कोट्यावधी रुपयांची कंपनी लालू यांना केवळ चार लाख रुपयांना मिळाली होती. यानंतर हा पैसा एबी एकस्पर्ट्सने डीएलएफच्या माध्यमातून नवी दिल्ली रेल्वे स्टेशन आणि बांद्रा स्टेशन अशा प्रकल्पांकरता लाच म्हणून देण्यात आली.
काही दिवसांपूर्वीच रांची कारागृहातून लालूंची जामिनावर मुक्तता झाली होती. झारखंड उच्च न्यायालयाकडून १ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांचा जामीन मंजूर करण्यात आला आहेत. तसेच त्यांना १० लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. काही शर्थी अटी ठेवण्यात आल्या आहेत. मंजुरीविना त्यांना देशबाहेर जाता येणार नाही. तसेच आपल्या घरचा पत्ता आणि मोबाईल नंबर बदलण्यास मनाई आहे.
लालू यादव यांना चारा घोटाळ्याच्या प्रकरणात कारागृहात ठेवण्यात आलं होतं. तीन वर्षांहून अधिक काळ त्यांनी कारागृहात घालवला. त्यांच्या तब्येतीमुळे ते काही काळ दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात उपचार घेत होते. आता ते त्यांच्या मुलीच्या घरी राहात आहेत.