भगवद्गीता: इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने त्यांच्या एमए पदवी कार्यक्रमात श्रीमद भगवद्गीतेचा समावेश केला आहे. म्हणजे आता तुम्ही IGNOU मध्ये भगवतगीतेमधून मास्टर्स करू शकता.हा अभ्यासक्रम जुलै २०२४ पासून मुक्त आणि दूरस्थ शिक्षणासाठी उपलब्ध होईल. आजपर्यंत जगातील कोणत्याही विद्यापीठात श्रीमद भागवत गीतेवर पदवी कार्यक्रम नव्हता. अमेरिकेतील हिंदू विद्यापीठातही फक्त त्याचे प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा दिला जातो. भारतातील अनेक विद्यापीठांमध्ये गीतेचा समावेश अभ्यासक्रमात आहे, परंतु तो केवळ प्रमाणपत्र किंवा पदविका पुरता मर्यादित होता. आता IGNOU द्वारे भगवद्गीतेमध्ये MA हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. याबद्दल जाणून घेऊया.
इग्नूने सुरू केलेल्या या कार्यक्रमाचे पूर्ण नाव एमए भगवद्गीता अध्यायन आहे. हा अभ्यासक्रम अनेक विद्यापीठांच्या कुलगुरू आणि प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक देवेश कुमार मिश्रा यांनी निर्मित आणि विकसित केला आहे. त्यांना या कार्यक्रमाचे समन्वयकही करण्यात आले आहे. सध्या इग्नूमध्ये गीतेमधून एमए करण्याचा हा कार्यक्रम हिंदी माध्यमात उपलब्ध आहे. येत्या काळात इंग्रजी माध्यमातही शिकवले जाऊ शकते. प्रोफेसर देवेश कुमार मिश्रा यांनी गेल्या 3 वर्षांत एमए ज्योतिष, एमए हिंदू स्टडीज, एमए वैदिक स्टडीज, वास्तुशास्त्रातील पीजी डिप्लोमा, संस्कृत संभाषणात प्रमाणपत्र कार्यक्रम असे कार्यक्रम आयोजित केले आहेत. या सर्व कार्यक्रमांचे ते समन्वयक आहेत.
भगवद्गीतेमधून एमए करण्यासाठीची फी
भगवद्गीतेमधून एमए करण्यासाठी एका वर्षासाठी ६३०० रुपये फी असून हा अभ्यासक्रम २ वर्षाकरिता असल्याने याची एकूण फी ही १२६०० रुपये आहे, हा अभ्यासक्रमासाठी उमेदवाराला मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर असणे अनिवार्य आहे. हा अभ्यासक्रम एकूण ८० क्रेडिट्सचा आहे.
अभ्यासक्रमासाठी संपर्क
विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाचे अभ्यास साहित्य प्रिंट आणि डिजिटल अशा दोन्ही स्वरूपात उपलब्ध करून दिले जाणार आहे. अभ्यासक्रमाशी संबंधित अधिक माहितीसाठी, विद्यार्थी समन्वयक देवेश कुमार मिश्रा यांना 9794265167 या क्रमांकावर संपर्क करू शकतात तसेच dkmishra@ignou.ac.in. या मेल आईडीवर ईमेल ही पाठवू शकतात.