सातारा : खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्या वाढदिवसानिमित्त उदयनराजे भोसले मित्र समूहाच्या वतीने सातारा शहरातील सार्वजनिक मंडळांसाठी ऐतिहासिक देखावा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
या स्पर्धेमध्ये आयोजकांनी शिवजयंती साजरी करताना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित काही प्रसंगांचे देखावे सादर करावयाचे आहेत. कोरोनाचा संक्रमण दर उतरणीला लागल्याने सातारा शहरांमध्ये शिवजयंतीचा अनोखा उत्साह पाहायला मिळत आहे. त्यामुळे यंदाची शिवजयंती मोठ्या जल्लोषात आणि थाटात साजरी केली जाणार आहे. यानिमित्त उदयनराजे भोसले मित्र समूहाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून, ऐतिहासिक देखावा स्पर्धा ही एक वेगळी स्पर्धा मानली जात आहे.
पहिले बक्षीस 25 हजार रुपये, द्वितीय बक्षीस 15 हजार रुपये, तृतीय बक्षीस दहा हजार रुपये आणि दोन उत्तेजनार्थ पाच हजार रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत. या देखावा स्पर्धेसाठी परीक्षक समिती स्वतंत्रपणे देखाव्यांचे परीक्षण करणार असून, त्याआधारे गुणांकन केले जाणार आहे. देखाव्याची कलात्मकता सादरीकरण या निकषांना धरून हे परीक्षण होणार आहे.