People Friendly Leader Who Puts Aside Partisanship Revenue Minister Balasaheb Thorat Nrms
पक्षभेद बाजूला सारणारा लोक हितैषि नेता : महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
विदर्भात, विशेषत: भंडाऱ्याचा बाजूने काही उद्योग व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. सगळीकडे त्यांना यश आले असेही म्हणता येणार नाही, परंतु कुठेही अडचण आली असेल तर ती स्पष्टपणे बोलण्यात त्यांनी कमीपणा मानला नाही. ‘मी इथे यशस्वी झालो, मला इथे अपयश आले,’ त्यांनी अगदी जाहीर व्यासपीठावर या सर्व गोष्टींचा उल्लेख केलेला आपल्याला दिसतो.
नितीन गडकरी ठामपणे मुद्दे मांडतात. आपल्या भूमिकेवर कायम राहतात. मला आठवते ते सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना नागपूर-वर्धा मार्गावर दोन उड्डाणपूल बांधण्याचा प्रस्ताव त्यांनी समोर ठेवला. त्या कामाला प्रचंड विरोध झाला. उड्डाणपुलाची गरजच काय? असे प्रश्न विचारले गेले, मात्र गडकरी हे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. आज मात्र त्यांनी दूरदृष्टीने घेतलेला निर्णय बरोबर होता हे लक्षात येते. राजकीय जीवनात विकासाचे निर्णय घेताना ठामपणा असावा लागतो. आपला निर्णय समाजाच्या भविष्यावर चांगले परिणाम करणारा, लोकांचे जीवन सुलभ करणारा असेल तर विरोधाला न जुमानता पुढे गेलं पाहिजे, हेच खरे. नितीन गडकरींमध्ये कायम तो दृढपणा मी बघितला.
एका मुलाखतीत मला प्रश्न विचारला, ‘विरोधी पक्षातील सर्वाधिक भावलेला नेता कोण?’ प्रश्नकर्त्याला भारतीय जनता पक्षाचा नेता अपेक्षित होता आणि पटकन माझ्याही तोंडावर नाव आले, नितीनजी गडकरी यांचे. त्याला कारण नितीन गडकरी यांचे व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या राजकीय आयुष्यात कधी ही व्यक्तीद्वेष जाणवत नाही. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून तयार झालेले असले, भारतीय जनता पक्षातून राजकारण करत असले तरी लोकशाहीवर त्यांची श्रद्धा आहे.
लोकशाही मुल्ये जपली पाहिजेत असे वाटणारे ते नेते आहेत. पक्षीय भेदाभेद विसरून विधायक कामासाठी पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची त्यांची तयारी असते. एखाद्या राजकीय नेत्याचा किंवा पक्षाचा बिगर राजकीय कार्यक्रम असेल तर त्यांना नितीन गडकरी कार्यक्रमाला हवेच असतात. त्यांच्याबद्दलचे माझे मत तयार व्हायला अनेक कारणे आहेत. हा सन २०१५ मधील प्रसंग आहे माझ्या संगमनेर मतदारसंघातून पुणे-नाशिक हायवे जातो. हा महामार्ग ऐन शहरातून जात असल्याने वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणावर व्हायची. त्याला संगमनेर शहराच्या बाहेरून बायपास काढणे हा एक पर्याय होता.
केंद्रात कमलनाथ रस्ते वाहतूक मंत्री असताना त्यांनी हा प्रश्न सोडवला आणि कामही पूर्ण झाले. परंतु बायपाससाठी संपादित केलेल्या जमिनींचा मोबदला शेतकऱ्यांना देण्याचा प्रश्न प्रलंबित होता. मोबदल्याच्या रकमेवरून वादाचा विषय झाला होता. लवादाने मोबदल्याची रक्कम ठरवली होती, मात्र रस्ते वाहतूक विभागाला ती रक्कम अधिक वाटत होती.
दरम्यानच्या काळात केंद्रात आणि राज्यातही सत्ता बदल झाला.
आता मी महसूलमंत्री देखील नव्हतो, मात्र हा प्रश्न सोडवण्यासाठी शेवटचा उपाय म्हणून केंद्रात रस्ते वाहतूक मंत्री झालेल्या नितीन गडकरी यांना भेटायला गेलो. दिल्लीत त्यांच्या कार्यालयात पोहोचल्यावर लक्षात आले, ते एका बैठकीत व्यस्त होते. त्यांच्या खाजगी सचिवांच्या केबिनमध्ये मी बसलो. माझी अपॉइंटमेंटची वेळ होताच नितीन गडकरी बैठकीतून बाहेर आले आणि त्यांनी विचारलं, ‘अरे ते बाळासाहेब थोरात आलेत का?’
मी म्हटले, ‘होय मी आलो आहे’
त्यावर नितीनजी माझ्याकडे आले आणि म्हणाले, अहो थोरात साहेब, तुम्ही येथे कुठे बसलात, ऑफिसमध्ये बसा. मी माझी मीटिंग दहा मिनिटांत संपवतो आणि मग आपण चर्चा करू.’ अत्यंत आस्थेवाईकपणे त्यांनी मला त्यांच्या ऑफिसमध्ये बसविले. पुढच्या दहा मिनिटांत त्यांची मीटिंग संपवून ते आले. अत्यंत लक्षपूर्वक त्यांनी प्रश्न समजून घेतला. मी देखील त्यांना माझी भूमिका पटवून दिली.
‘शेतकऱ्यांना मोबदला देण्या संदर्भाने लवादाने दिलेला निर्णय ग्राह्य धरा, अशा सूचना आपल्या विभागाला द्या,’ असा आग्रह मी धरला. त्यांनी लागलीच सुधीर देऊळगावकर या त्यांच्या स्वीय सहाय्यकाला बोलविले. त्या कामाच्या संदर्भाने त्यांना अपेक्षित सूचना दिल्या. ‘काही बाबी तपासून घेतो, महिनाभरात काम होऊन जाईल’, असे सांगितले आणि खरंच पुढच्या महिनाभरात ते काम मार्गी लागले. शेतकऱ्यांना मोबदला मिळाला. त्यांच्यासोबतचे असे अनुभव अनेक जण सांगतील. लोकहिताचे काम असेल तर ते काम नितीन गडकरी आग्रहाने मार्गी लावतात, पक्षीय भेद बाजूला ठेवतात. हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.
शेतीशी संबंधित, सहकार क्षेत्राबद्दल विशेषतः साखर कारखानदारी बद्दल जर काही प्रश्न निर्माण झाले, तर शदर पवार यांनी कायमच ते सोडविले. सन २०१४ पूर्वी शरद पवार हे कृषी मंत्री होते, त्यामुळे या विषयाशी संलग्नित प्रश्नांची कायम त्यांच्याशी चर्चा व्हायची, त्यावेळीही गडकरी हे विरोधी पक्षाकडून चर्चेला असायचे. विशेषतः भाजपच्या बाबतीत नेहमी असे म्हटले जाते की भाजप आणि सहकार याचा काही संबंध नाही, परंतु गडकरी त्याला अपवाद असायचे. आजही केंद्रामध्ये शेती सहकाराशी संबंधित मुद्दा मांडायचा असेल तर, ‘नितीन गडकरींशी बोलावे लागेल,’ हे वाक्य सहजपणे आमच्या तोंडून निघून जाते, ही वस्तुस्थिती आहे.
शासन चालवण्याचा गडकरींचा अनुभव फार मोठा आहे, सन १९८९ ते २०१४ पर्यंत ते विधान परिषदेत होते. सन १९९५ ते ९९ यादरम्यान युती सरकारमध्ये ते राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. या याकाळात महामार्गांच्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्राला शहरांशी जोडण्याचे महत्त्वपूर्ण काम त्यांनी केले. उड्डाणपुलांची कामही या काळात उल्लेखनीय झाली.
खाजगी विकासकांना सहभागी करून घेऊन त्यांच्या विभागाने अनेक नव्या प्रकल्पांसाठी निधीची उभारणी केली. त्यांच्या या भूमिकेला आमच्यासह शिवसेना आणि भाजपमधील काही नेत्यांचा विरोध होता. मात्र आपल्या भूमिकेचे समर्थन करताना अनेक भाषणांत ते नेहमी सांगायचे, ‘निव्वळ सरकारच्या माध्यमातून १०० टक्के विकासाचे लक्ष्य गाठणे शक्य नाही. आपण जर खासगीकरणाला प्रोत्साहन दिले तर विकासाची प्रक्रिया अधिक गतिमान होईल.’
नितीन गडकरी ठामपणे मुद्दे मांडतात. आपल्या भूमिकेवर कायम राहतात. मला आठवते ते सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना नागपूर वर्धा मार्गावर दोन उड्डाणपूल बांधण्याचा प्रस्ताव त्यांनी समोर ठेवला. त्या कामाला प्रचंड विरोध झाला. उड्डाणपुलाची गरजच काय? असे प्रश्न विचारले गेले, मात्र गडकरी हे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. आज मात्र त्यांनी दूरदृष्टीने घेतलेला निर्णय बरोबर होता हे लक्षात येते.
राजकीय जीवनात विकासाचे निर्णय घेताना ठामपणा असावा लागतो. आपला निर्णय समाजाच्या भविष्यावर चांगले परिणाम करणारा, लोकांचे जीवन सुलभ करणारा असेल तर विरोधाला न जुमानता पुढे गेलं पाहिजे, हेच खरे. नितीन गडकरींमध्ये कायम तो दृढपणा मी बघितला. गडकरी हे, सहकार चळवळीबद्दल आस्था असणारे व्यक्तिमत्व आहे. गडकरी विरोधी पक्षनेते असताना महाराष्ट्र शेतजमीन अधिनियम या विषयावरील चर्चेदरम्यान, त्यांनी सहकार खात्यातील अधिकारी खाबुगिरी करतात, असा आरोप केला. लक्ष्मीदर्शन झाल्याशिवाय अधिकारी काम करत नाही, असे म्हटले.
या सहकारी संस्था कोठून पैसे देणार? असा उद्विग्न सवालही केला. आम्हाला आठवते, गडकरी म्हणाले होते, ‘राज्याच्या दृष्टीने सहकार चळवळ अत्यंत महत्त्वाची आहे. यशवंतराव, वसंतदादा यांनी या चळवळीसाठी केलेले काम फार मोठे आहे. कोणी काहीही म्हणत असले तरी सहकार चळवळीने महाराष्ट्रात आदर्श निर्माण केला आहे.’
नितीन गडकरींनी अनेक प्रयोग केले, साखर कारखानदारीत ते उतरले, इथेनॉल निर्मिती त्यांनी सुरू केली, पूर्ती बाजार सारख्या कल्पना पुढे नेण्याचा प्रयत्न केला. निव्वळ विचार मांडून थांबायचे नाही, तर ते उद्योग-व्यवसाय आपण स्वतः करायचे, हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. विदर्भात साखर कारखानदारी नाही आणि साखर कारखानदारी नाही म्हणून ऊस नाही आणि पुन्हा ऊस नाही म्हणून साखर कारखानदारी नाही हे दुष्टचक्र भेदने शक्य झाले नाही, त्यांनी मात्र पूर्तीच्या निमित्ताने हा प्रयत्न केलेला दिसतोय.
विदर्भात, विशेषत: भंडाऱ्याचा बाजूने काही उद्योग व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. सगळीकडे त्यांना यश आले असेही म्हणता येणार नाही, परंतु कुठेही अडचण आली असेल तर ती स्पष्टपणे बोलण्यात त्यांनी कमीपणा मानला नाही. ‘मी इथे यशस्वी झालो, मला इथे अपयश आले,’ त्यांनी अगदी जाहीर व्यासपीठावर या सर्व गोष्टींचा उल्लेख केलेला आपल्याला दिसतो.
निव्वळ सवंग लोकप्रियतेसाठी गडकरींनी कधीच भाषणे केली नाही. गडकरी नेहमी आपल्या भाषणातून मुद्दा मांडण्याच्या जोडीने पर्यायही सुचवत असायचे. त्यांच्या बऱ्याचशा कल्पना शासनासाठी फायदेशीर ठरायच्या. वीज वापर वाढल्यानंतर काही परदेशी कंपन्यांना वीज निर्मिती करण्याबाबत परवानगी देण्याच्या दृष्टीने शासन विचार करत होते. त्यावेळी गडकरींनी शासनाच्या भूमिकेवर सभागृहात टीका केली, पण विदर्भात मोठ्या प्रमाणावर कोळसा आहे. तिथे छोटे छोटे उद्योजक वीज निर्मितीचे प्लांट टाकू शकतात. त्यांना परवानगी द्या. परवानगी देण्याची पद्धत सोपी करा.
सहकारी साखर कारखान्यांचे फायदेशीर अर्थशास्त्र समाजवताना ते सभागृहात म्हणाले होते, अनेक साखर कारखाने ऊसापासून मोलॅसिस तयार करतात. त्याच्या पासून इथेनॉलची निर्मितीही करता येते. केंद्र सरकारने दहा टक्के इथेनॉल इंधनामध्ये वापरायला परवानगी दिली आहे, आपण जास्तीत जास्त साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मिती करण्यासाठी प्रेरित करा. असे केले तर कारखाने फायद्यात येतील.
राजकारणाच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्राच्या हिताचे अनेक विषय त्यांनी सभागृहात मांडले, ‘इन्फ्रास्ट्रक्चरच्या जोडीने प्लांटेशनवर लक्ष दिले पाहिजे. त्यात कोणत्या प्रकारची झाडे असली पाहिजे? त्याच्यापासून शासनाला, वनविभागाला कसे उत्पन्न मिळू शकेल?’ अशा विधायक विषयांची त्यांनी सभागृहात चर्चा केली.
शिक्षणाच्या सुविधांचा सर्व जिल्ह्यांमध्ये विस्तार झाला पाहिजे, त्यासाठी एक स्टॅट्युटरी बोर्ड तयार करावे, ते बोर्ड कुलगुरूची नियुक्ती करेल. तसेच शैक्षणिक अभ्यासक्रम तयार करेल. ज्या जिल्ह्यांमध्ये कॉलेजची संख्या कमी आहे तिथे ती वाढवेल. थोडक्यात शिक्षणात पारदर्शकता आणेल. अशा अनेक चांगल्या सूचनाही त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणून केल्या.
ते खासगी विकसकाबद्दल बोलायचे तितक्याच पोटतिडकीने तळागाळातल्या माणसाच्या हिताचा विचार सभागृहात मांडायचे.
विरोधात असूनही सरकारला चांगल्या मुद्द्यांवर समर्थन द्यायचे, सहकार्य करायचे. त्यामुळेच आजही ते स्व:पक्षाहून विरोधी पक्षात अधिक लोकप्रिय आहेत. विरोधी पक्षनेते म्हणून काम करताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा नानाविध छटा आम्हाला अनुभवायला मिळाल्या. त्यांना मी सरकारला धारेवर धरताना बघितलं, हळवे होताना बघितले, मिश्कीलपणे चिमटे काढून सभागृहाला खळखळून हसवताना बघितले. राजकारण आणि समाजकारण एका नैतिकतेच्या भावनेतून करणाऱ्या या नेत्याला वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक अनेक शुभेच्छा!
बाळासाहेब थोरात
महसूल मंत्री, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते
Web Title: People friendly leader who puts aside partisanship revenue minister balasaheb thorat nrms