आजपासून (रविवार) देशभरात पोलिओ लसीकरण मोहिमेला सुरुवात होत आहे. दरवर्षी १७ जानेवारीला देशभरात पोलिओ लसीकरण केलं जातं. हा दिवस पोलिओ लसीकरण दिन म्हणून साजरा केला जातो. मात्र यंदा कोरोनाच्या संकटामुळे हा दिवस पुढे ढकलण्याचा निर्णय केंद्रीय आरोग्य खात्यानं घेतला होता. आता आजपासून पोलिओ लसीकरणाला सुरुवात झालीय.
राष्ट्पती रामनाथ कोविंद यांनी शनिवारी राष्ट्रपती भवनात पाच लहान मुलांना पोलिओचे डोस पाजून या मोहिमेचं उद्घाटन केलं. आता यापुढे ३१ जानेवारी हा दिवस पोलिओ लसीकरण दिन म्हणून ओळखला जाणार आहे. आजपासूून तीन दिवस म्हणजे रविवार, सोमवार आणि मंगळवारी पोलिओ लसीकरण सुरू राहणार आहे.
शून्य ते पाच वर्ष वयोगटातील मुलांना पोलिओचा डोस दिला जाईल. २ फेब्रुवारीपर्यंत ही मोहिम सुरू राहिल. आजचा दिवस राष्ट्रीय लसीकरण दिन म्हणून ओळखला जाणार आहे. पोलिओ लसीकरणासाठी चिमुरड्यांना घेऊन जाताना कोरोनाबाबतचे सर्व निकष आणि अटी पाळणे बंधनकारक असेल. सोशल डिस्टन्सिंग ठेवणे, मास्क घालणे आणि सॅनिटायझेशन या गोष्टी बंधनकारक असणार आहेत. [read_also content=”सोमवारपासून लोकल पासला मुदतवाढ, रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय https://www.navarashtra.com/latest-news/extension-of-local-pass-from-monday-big-decision-of-railway-administration-nrms-83520.html”]
कोरोनाचा प्रभाव अजूनही ओसरला नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी लहान मुलांना पोलिओ बुथवर नेण्यासाठी बाहेर पडू नये, असं आवाहन करण्यात आलंय. शक्यतो, मुलांच्या पालकांनी किंवा साठपेक्षा कमी वय असणाऱ्यांनी मुलांना पोलिओ बुथवर घेऊन जावे, असं सांगण्यात आलंय.