पुण्यातील हिंजेवाडी फेज-1 या परिसरातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका आयटी कंपनी मध्ये कार्यरत असलेल्या २३ वर्षीय तरुणाने टोकाचे पाऊल उचलले आहे. आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव पियुष कवडे असून, तो ॲटलास कॉपको या कंपनीत नोकरीला असल्याची माहिती समोर आली आहे.
विनयभंगाचा बदला घेण्यासाठी हत्येच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा रचला कट; आरोपींना अटक
पियुषने ॲटलास कॉपको कंपनीच्या सातव्या मजल्यावरुन उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना सोमवारी (दि. 28 जुलै) दुपारच्या सुमारास घडली. छातीत दुखत असल्याचे सांगून तो मीटिंग सोडून बाहेर पडला होता आणि त्यानंतर त्याने थेट सातव्या मजल्यावरून उडी मारत आपलं आयुष्य संपवलं. आत्महत्येपूर्वी त्याने एक चिठ्ठी देखील लिहून ठेवली होती. त्या चिठ्ठीत त्याने “माझ्या मृत्यूला कुणालाही जबाबदार धरू नका”,असे त्यांनी म्हंटले आहे.
पियुष हा वर्षभरापासून ॲटलास कॉपको कंपनीत सॉफ्टेवेअर इंजिनिअर म्हणून पियुष कवडे हा नोकरी करत होता. त्याचा पगार देखील चांगला होता. अद्याप त्याच्या आत्महत्येचा कारण समोर आलेला नाही आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा सुरु केला. पियुषचा मृतदेह पोस्ट मॉर्टमसाठी पाठवण्यात आल्यांनतर पोलिसांनी याबाबत कसून चौकशी केली आहे. प्रेमप्रकरणातून ही आत्महत्या झाली आहे का? याचा देखील तपास पोलीस करत आहे.
बारामतीमध्ये भीषण अपघात! डंपर खाली दुचाकी आल्याने तीन जणांचा मृत्यू
बारामतीमधील महात्मा फुले चौकात भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. हा अपघात डंपर आणि दुचाकीच्या मधात झाला. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. वडील आणि त्यांच्या दोन मुली यांच्या मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी डंपरच्या चाकाखाली दुचाकी सापडली आणि तिघेही चेंगरले गेले. ही घटना 27 जुलै रोजी घडली आहे.
या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींचे नावे वडील ओंकार आचार्य व त्यांच्या दोन मुलींचे नावे चार वर्षाची मधुरा आणि दहा वर्षाची सई आचार्य असे आहे. ओंकार आचार्य हे मूळचे इंदापूर तालुक्यातील सणसर येथील रहिवासी असून सध्या बारामतीतील मोरगाव रोड येथे ते वास्तव्यास होते. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकी चालक ओंकार आचार्य यांचं पोटापासून खाली काहीच शिल्लक उरलं नव्हतं. आपल्या मुलीना रस्त्यावर पडलेलं पाहून हळहळलेल्या वडील ओंकार यांनी आपल्या दोन हातांवर जोर देत उठण्याचा प्रयत्न करत होते. माझ्या मुलींना तेवढं वाचवा असं म्हणत होते.