किंग्सटाउन : टी-20 विश्वचषकातील सर्वात महत्त्वाचा सामना आज पाहायला मिळाला ज्यामध्ये अफगाणिस्तानने बांगलादेशला हरवून स्वतःतर सेमीफायनलचे तिकीट कन्फर्म केलेच तर दुसरीकडे ऑस्ट्रेलिया या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. भारतीय संघाला मागच्या वर्षीचा वर्ल्डकप सर्वात बोचरी जखम ठरणारा होता. 19 नोव्हेंबर 2023 हा दिवस भारतीय संघासाठी हृदयद्रावक ठरला. टीम इंडियाच्या खेळाडूंना अश्रू अनावर झाले होते. परंतु, यावेळी भारतीय संघाने सर्वाचा बदला घेत ऑस्ट्रेलियाच्या संघाला जागा दाखवली अन् आज अफगाणिस्तानने बांगलादेशला हरवून ऑस्ट्रेलियाला स्पर्धेतून बाहेर केले.
अहंकारी ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाहेर
चाहत्यांची निराशा झाली असतानाच दुसरीकडे ऑस्ट्रेलियन कॅम्पमधून एक चित्र समोर आले. सध्याचा T20 विश्वचषक कर्णधार मिचेल मार्श चित्रात होता. त्याच्या हातात बिअर होती, तर त्याचे पाय एकदिवसीय विश्वचषकाच्या चमकदार ट्रॉफीवर होते. प्रत्येक क्रिकेट चाहत्याला हे वाईट वाटले. प्रत्येकाचा असा विश्वास होता की, ऑस्ट्रेलियन लोक अहंकाराने भरलेले आहेत. आता वर्षभरातच टी-20 विश्वचषकात अफगाणिस्तानकडून पराभव पत्करावा लागला नाही, तर भारतानेही त्यांच्या पराभवाचा बदला घेतला आणि अशा प्रकारे ऑस्ट्रेलियाचा टी-20 विश्वचषकातील प्रवास संपला.
T20 विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठणे हे एक स्वप्न पूर्ण झाले : राशिद खान
बांगलादेशविरुद्धच्या ऐतिहासिक विजयानंतर अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खान म्हणाला, उपांत्य फेरी गाठणे आमच्यासाठी स्वप्नासारखे आहे. आम्ही स्पर्धेची सुरुवात कशी केली यावर सर्व काही अवलंबून आहे. न्यूझीलंडला हरवल्यावर हा आत्मविश्वास आला. ही भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. आम्हाला उपांत्य फेरीपर्यंत पोहोचवणारी एकमेव व्यक्ती होती ती म्हणजे ब्रायन लारा आणि आम्ही ते बरोबर सिद्ध केले. मी त्याला सांगितले की, आम्ही तुला निराश करणार नाही.