मोबाईल, लॅपटॉप अशा इलेकट्रोनिक वस्तू आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनून राहिल्या आहेत. मोबाईलद्वारे अगदी काही क्षणातच आपण कोणाशीही सहज संपर्क साधू शकतो. अनेकांना कामाच्या धागधुगीत आपल्या मोबाईलला चार्ज करण्यासाठी वेळचं मिळत नाही. बऱ्याचदा प्रवास करताना प्रवासात या मोबाईलचा बराच उपयोग होत असतो. कोणाशी संपर्क साधायचा असो वा एखाद्या गोष्टीची माहिती शोधायची असो, मोबाईल विविध प्रकारे वापरला जाऊ शकतो. अशा परिस्थिती याला नेहमी चार्ज ठेवते अत्यंत आवश्यक आहे.
प्रवासादरम्यान आपला मोबाईल किंवा लॅपटॉप चार्ज कसा करावा असा प्रश्न अनेकांच्या मनात येत असतो, मात्र आता चिंता करण्याची काहीच गरज नाही. आता तुम्ही तुमचा मोबाईल किंवा लॅपटॉप अवघ्या काही मिनिटांतच चार्ज करू शकता. भारतीय संशोधक अंकुर गुप्ता आणि त्यांच्या टीमने एका नवीन तंत्रज्ञानाविषयी शदले आहे. ज्यानुसार लॅपटॉप, मोबाईल अवघ्या काही मिनिटांतच चार्ज करता येतील. प्रोसिडिंग्ज ऑफ द नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्सेस या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या रिसर्चमध्ये संशोधनकांनी हे शोधले आहे की, आयन नावाचे लहान आकाराचे कण, सूक्ष्म छिद्रांच्या नेटवर्कमध्ये कसे फिरतात. US मध्ये स्थित कोलोरॅडो बोल्डर विद्यापीठातील रासायनिक आणि जैविक इंजिनिअरिंगचे सहाय्यक प्राध्यापक अंकुर गुप्ता यांच्या मते या यशामुळे ‘सुपरकॅपेसिटर’ सारख्या अधिक प्रमाणात ऊर्जा साठवणाऱ्या उपकरणांचा विकास होणे संभव आहे.
[read_also content=”प्रत्येक ब्रँडच्या एसीमध्ये तापमान 16 च्या खाली आणि 30 च्यावर का जात नाही? जाणून घ्या कारण https://www.navarashtra.com/technology/why-doesnt-temperature-go-below-16-and-above-30-in-every-brand-of-ac-find-out-the-reason-540005.html”]
अंकुर गुप्ता आणि त्याच्या टीमने शोधलेले तंत्रज्ञान फक्त वाहने आणि इलेकट्रोनिक उपकरणांमध्येच नाही तर पॉवर ग्रीडसाठीही महत्त्वाचा आहे. येथे चाड उत्तर करणाऱ्या ऊर्जेचे जलद वितरण होते. अंकुर गुप्ता म्हणाले की, सुपरकॅपॅसिटर, एक ऊर्जा साठ्वणयचे उपकरण असून त्यांच्या छिद्रांमध्ये आयन संग्रहांवर अवलंबून असतात. त्यामुळेच यात बॅटरीच्या तुलनेत जलद चार्जिंग होणे शक्य आहे आणि याची बॅटरी लाइफदेखील जास्त आहे.
या संशोधनामुळे आता मोबाईल आणि इलेकट्रीक गाड्यांच्या चार्जींगमध्ये क्रांती होण्याची शक्यता वर्तवली जाऊ शकते. एवढेच नाही तर यामुळे ऊर्जा क्षेत्रातील अनेक समस्या दूर होऊ शकतील. थोडक्यात अंकुर गुप्ता यांच्या या नवीन संशोधनामुळे भविष्याकालीन तंत्रज्ञानात नक्कीच फायदा होणार आहे.