१. शिवसेना आमदारावर जीवघेणा हल्ला
2. संगमनेरमधील घटना
3. संगमनेर फेस्टिवलकार्यक्रमात घडली घटना
संगमनेर: राज्याच्या राजकारणातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे. संगमनेरमध्ये शिवसेना आमदार अमोल खताळ यांच्या जीवघेणा हल्ला झाला आहे. संगमनेर फेस्टिवलच्या कार्यक्रमात त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे. आमदार अनोल खताळ हे संगमनेरमध्ये ‘संगमनेर फेस्टिवल’च्या उद्घाटनाला आले होते.
‘संगमनेर फेस्टिवल’च्या उद्घाटनाला आले असताना शिवसेना आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे. कार्यक्रमामध्येच एका तरुणाने त्यांच्यावर हल्ला केल्याचे समजते आहे. आमदार अमोल खताळ यांना हस्तांदोलन करण्यासाठी पुढे आलेल्या तरुणाने अचानक त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
आमदार अमोल खताळ यांच्या एका तरुणाने हल्ल्याचा प्रयत्न केला आहे. हा हल्ला त्याने का केला याचे कारण द्याप समोर येऊ शकलेले नाही. मात्र या घटनेने संगमनेरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच कार्यक्रमस्थळी शिवसेना आमदार अमोल खताळ यांचे समर्थक मोठ्या संख्येने जमा झाले होते.
या घटनेमुळे संगमनेरमधील वातावरण तापण्याची शक्यता आहे. पोलिसानी बंदोबस्त वाढवला आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेना आमदार अमोल खताळ यांच्यावर झालेल्या हललूयचा निषेध व्यक्त केला आहे. त्यांनी पोलिसांना चौकशीचे आदेश दिले असल्याचे समजते आहे.
पाण्यावाचून वंचित असलेल्या पठार भागाला दिलासा मिळणार
संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागातील दिर्घकाळ प्रलंबित पाणी प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मुंबई येथे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मंत्रालयातील दालनात विशेष बैठक पार पडली. या बैठकीत जलसंपदा विभागाने बॅरेज बंधाऱ्यांचा पर्याय समोर आणला आहे. या माध्यमातून साकूर पठार भागाचा पाणी प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागणार असून, गेल्या अनेक वर्षांपासून पाण्यावाचून वंचित असलेल्या पठार भागाला दिलासा मिळणार आहे. या बैठकीला आमदार अमोल खताळ, भाजपा तालुकाध्यक्ष गुलाब भोसले, भाजप राज्य कार्यकारिणी सदस्य रऊफ शेख यांच्यासह शिष्टमंडळ उपस्थित होते.
Amol Khatal : अनेक वर्षांपासून पाण्यावाचून वंचित असलेल्या पठार भागाला दिलासा मिळणार, विखेंचा पुढाकार
नेमके काय घडले?
शिवसेना आमदार अमोल खताळ हे संगमनेरमधील एका कार्यक्रमाच्या उद्घाटनाला आले होते. तेव्हा हात मिळवण्याकया उद्देशाने एक तरुण पुढे आला आणि त्याने आमदार खताळ यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्या ठिकाणी समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. हा हल्ला का करण्यात आला याचे कारण समोर आलेले नाही. संगमनेर पोलिस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.