Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rohit Pawar PC: ‘हा घातपात असू शकतो अशी मला शंका..; रोहित पवारांना संशय

अजित पवार कारने बारामतीला येणार होते, पण ते विमानाने कसे जातील, यासाठी कोणी प्रयत्न केले होते का याचा तपास करावा, अशी मागणी रोहित पवारांकडून करण्यात आली आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Feb 10, 2026 | 06:26 PM
Rohit Pawar PC: ‘हा घातपात असू शकतो अशी मला शंका..; रोहित पवारांना संशय
Follow Us
Follow Us:
  • राज्यभरातून अजित पवारांच्या अपघातावर संशय
  • विमान एका बाजूला का कलले? त्यात तांत्रिक किंवा मेकॅनिकल बिघाड होता का?
  • दोन दिवसांपूर्वी सुरतवारी करून आलेल्या या विमानाची तांत्रिक क्षमता प्रवासासाठी योग्य होती का?
 

Rohit Pawar Press Conference:  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनाने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे.  त्यांच्या निधानावर राज्यभरातून संशय व्यक्त केला जात आहे. या सगळ्या घटनाक्रमावर रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेतून  भाष्य केलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे अजितदादांचा विमान अपघात हा अपघात नसून घातपात असू शकतो. याचा तपास देशातील तपास यंत्रणांसह परदेशातील तपास यंत्रणांकडून व्हावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.  (Ajit Pawar Plane crash) 

काय म्हणाले रोहित पवार?

रोहित पवार म्हणाले, अजितदादांचा २८ जानेवारीला कारने जाण्याचा प्लॅन होता. पण काही कारणं काढून मुंबईतच त्यांचा वेळ कसा जाईल आणि दुसऱ्या दिवशी घाई गडबडीत अजितदादा विमानाने कसे जातील असं काही प्लॅनिंग झालं होतं का, विमानाचे दोन्ही पायलट ऐनवेळीच कसे बदलण्यात आले,असे अनेक प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केले आहेत. VSR कंपनीच्या विमानाला मेंटेनन्स सर्टिफिकेट कुणी दिलं, त्याचा रिपोर्ट अजूनही का समोर आला नाही, असाही प्रश्न रोहित पवारांनी विचारला.

Rohit Pawar PC: तर त्या रिपोर्टमध्ये छेडछाड होऊ शकते…; अजित पवारांच्या अपघाताबाबत रोहित पवारांचे खडे सवाल

अजित पवार कारने बारामतीला येणार होते, पण ते विमानाने कसे जातील, यासाठी कोणी प्रयत्न केले होते का याचा तपास करावा, अशी मागणी रोहित पवारांकडून करण्यात आली आहे. तसेच, विमान अपघातावेळी पायलटने मेडे कॉल का केला नाही, विमानाचा ट्रान्सपाँडर जाणीवपूर्वक बंद करण्यात आला का, पायलटला विानाचा अपघातच घडवायचा होता का, असेही अनेक प्रश्न रोहित पवार यांनी विचारले आहेत. तसेच, दादांच्या अपघाताची चौकशी ही इथल्या संस्थेने करावी, पण त्याचवेळी फ्रान्स किंवा अमेरिकेच्याही संस्थांमार्फत केली जावी, अशी मागणी रोहित पवार यांच्याकडून करण्यात आली आहे.

 

अजित पवारांच्या विमान अपघाताचा घटनाक्रम आणि शंका

अपघाताचा तपशील: अजित पवार ज्या ‘व्हीएसआर’ कंपनीच्या विमानाने प्रवास करत होते ते १६ वर्षे जुने होते. या लेअरजेट विमानाने त्यांना मुंबई ते बारामती असा २१० किमीचा प्रवास करायचा होता. सकाळी ८:१० वाजता विमानाने टेक ऑफ केले. लोणावळ्याजवळ ८:४३ ते ८:४५ च्या दरम्यान ही दुर्घटना घडली. सकाळी ९:४५ वाजता त्यांच्या निधनाची अधिकृत बातमी आली. कंपनीच्या मालकांनी दाट धुक्यामुळे अपघात झाल्याचा दावा केला असला तरी, प्रत्यक्षदर्शींनुसार विमान एका बाजूला कलले होते आणि खाली येताच त्याचा स्फोट झाला. यामुळे तांत्रिक बिघाडाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

रोहित पवारांनी उपस्थित केलेले ५ प्रश्न:

विमानाची स्थिती: विमान एका बाजूला का कलले? त्यात तांत्रिक किंवा मेकॅनिकल बिघाड होता का?

तपासणी अहवाल: टेक ऑफपूर्वी विमानाची रीतसर पाहणी झाली होती का? विमानाचा ‘टेकलॉग’ आणि ‘एअरवर्थी रिपोर्ट’ कुठे आहे?

देखभाल (Maintenance): विमानाचे नियमित मेंटेनन्स कोणी केले होते? हँगरमधील सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध आहे का?

मोठी दुरुस्ती: विमानाचे ‘हेव्ही मेंटेनन्स’ कधी झाले होते आणि त्याचा अहवाल काय सांगतो?

सुरक्षितता: दोन दिवसांपूर्वी सुरतवारी करून आलेल्या या विमानाची तांत्रिक क्षमता प्रवासासाठी योग्य होती का?

Ajit Pawar Plane crash conspircy: अजितदादांच्या विमानात सुसाईड बॉम्बर; अमोल मिटकरींचा पुन्हा गंभीर आरोप

तपासातील त्रुटी आणि प्रलंबित प्रश्न

अपघाताला १३-१४ दिवस उलटूनही सीसीटीव्ही गोळा करण्यापलीकडे ठोस प्रगती झालेली नाही. या विलंबामुळे संबंधित कंपनीला खोटे पुरावे तयार करण्याची संधी मिळाल्याची भीती व्यक्त होत आहे. बारामती विमानतळावर ILS (Instrument Landing System) नसल्याचे कारण पुढे केले जात आहे, परंतु ते कितपत सत्य आहे हा तपासाचा विषय आहे.

कंपनीचा वादग्रस्त इतिहास: ‘व्हीएसआर’ कंपनीच्या विमानाचा दोन वर्षांपूर्वीही अपघात झाला होता, मात्र त्याचा तपास अहवाल अद्याप समोर आलेला नाही. हा जुना अहवाल दाबला गेल्यामुळेच आजची दुर्घटना घडली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे.

आंतरराष्ट्रीय बंदी आणि भारतीय दुर्लक्ष: ज्या कंपनीच्या विमानाला सुरक्षेच्या कारणास्तव युरोपमध्ये बंदी घालण्यात आली आहे, तीच विमाने भारतात कोणत्याही अडथळ्याविना कशी काय उड्डाण करत आहेत? याकडे प्रशासनाने केलेले दुर्लक्ष गंभीर आहे.

 

 

 

 

Web Title: Rohit pawar pc ajit pawars plane crash could be an accident rohit pawar expresses doubt

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 06:26 PM

Topics:  

  • Ajit Pawar in Baramati
  • ajit pawar plane crash
  • plane crash news
  • rohit pawar

संबंधित बातम्या

‘शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा केलाच पाहिजे’; भाजप सरकारवर हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघात, कर्जमाफीसाठी एल्गार तीव्र
1

‘शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा केलाच पाहिजे’; भाजप सरकारवर हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघात, कर्जमाफीसाठी एल्गार तीव्र

Rohit Pawar: ‘शेतकऱ्यांसाठी आंदोलन स्थगित, पण…’, गिरीश महाजनांच्या मध्यस्थीनंतर रोहित पवारांचे एल्गार आंदोलन तात्पुरते मागे
2

Rohit Pawar: ‘शेतकऱ्यांसाठी आंदोलन स्थगित, पण…’, गिरीश महाजनांच्या मध्यस्थीनंतर रोहित पवारांचे एल्गार आंदोलन तात्पुरते मागे

Plane Crash: ‘2 देश, 2 अपघात आणि 25 जणांचा मृत्यू…’ आकाशात नेमकं काय घडतंय? फ्रान्स आणि सौदीतील दुर्घटनांनी चिंता वाढवली
3

Plane Crash: ‘2 देश, 2 अपघात आणि 25 जणांचा मृत्यू…’ आकाशात नेमकं काय घडतंय? फ्रान्स आणि सौदीतील दुर्घटनांनी चिंता वाढवली

मोठी बातमी! ऑपरेशन टायगरनंतर ‘ऑपरेशन तुतारी’ची चर्चा; शरद पवार गटाच्या खासदाराची फडणवीसांसोबत भेट; रोहित पवारांचा मोठा दावा
4

मोठी बातमी! ऑपरेशन टायगरनंतर ‘ऑपरेशन तुतारी’ची चर्चा; शरद पवार गटाच्या खासदाराची फडणवीसांसोबत भेट; रोहित पवारांचा मोठा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.