१० लाख कुटुंबांपर्यंत पोहोचले स्वयंसेवक; पश्चिम महाराष्ट्र प्रांतात 'गृहसंवाद' मोहिमेला मोठा प्रतिसाद
मागील महिन्यात राबवण्यात आलेल्या गृहसंवाद अभियानांतर्गत १० लाख ८५ हजारांहून अधिक कुटुंबांशी प्रत्यक्ष संपर्क साधण्यात आला. यावेळी स्वयंसेवकांनी कुटुंबातील सदस्यांशी ‘पंचपरिवर्तन’ (सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण संरक्षण, स्वदेशी जीवनशैली आणि नागरिक कर्तव्य) या विषयांवर सविस्तर चर्चा केली.
PCMC New Commissioner: डॉ. विजय सूर्यवंशी यांनी स्वीकारला पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तपदाचा पदभार
समाज आणि संघातील दुवा अधिक घट्ट करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील ७ शासकीय जिल्ह्यांमध्ये विविध संस्था-संघटनांच्या माध्यमातून ३ हजार संमेलने होत आहेत. या संमेलनांमध्ये सुमारे १२ लाख नागरिक आणि संघ स्वयंसेवक सहभागी होत आहेत. एकट्या पुणे महानगरात ४५० सकल हिंदू संमेलनांचे नियोजन करण्यात आले आहे. प्रा. जाधव म्हणाले की, संघाचा विस्तार म्हणजे केवळ संख्यात्मक वाढ नसून, संघ आणि समाजाने एकत्र येऊन राष्ट्रहितासाठी काम करणे आहे. एप्रिल अखेरपर्यंत ही सर्व संमेलने पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर संघटनेचा अभूतपूर्व विस्तार झाला असून, देशभरातील शाखांची संख्या आता ८८,९४९ वर पोहोचली आहे. याच संकल्पाचा भाग म्हणून पश्चिम महाराष्ट्र प्रांतात एप्रिल अखेरपर्यंत ३ हजार ‘सकल हिंदू संमेलने’ आयोजित केली जाणार आहेत, अशी माहिती प्रांत संघचालक प्रा. सुरेश (नाना) जाधव यांनी सोमवारी (१६ मार्च) पत्रकार परिषदेत दिली.
हरियाणा येथे पार पडलेल्या ‘अखिल भारतीय प्रतिनिधी सभे’च्या निर्णयांची आणि प्रांतातील कार्याची माहिती देण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव, पुणे महानगर कार्यवाह सचिन भोसले आणि विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष अभय कुलकर्णी उपस्थित होते.
BJP ने डाव्यांची सत्ता घालवण्यासाठी टाकला डाव! जाहीर केली ‘या’ 47 उमेदवारांची पहिली यादी
संघाचा विचार घराघरात पोहोचवण्यासाठी राबवण्यात आलेल्या गृहसंवाद अभियानाची आकडेवारी प्रा. जाधव यांनी मांडली, “२४ जिल्ह्यांतील १० लाख ८५ हजार कुटुंबांपर्यंत ४५ हजार स्वयंसेवक पोहोचले. ५५ नगरांमधील ५१२ वस्तूंमधून ३ लाख ४९ हजार ५३ घरांशी १०,८७९ स्वयंसेवकांनी प्रत्यक्ष संवाद साधला. कुटुंबातील सदस्यांशी ‘पंचपरिवर्तन’ या विषयावर चर्चा करून सामाजिक बदलाचा पाया रचणे.
शताब्दी वर्षात संघटनात्मक झेप (देशभरातील स्थिती)
गेल्या वर्षभरात संघकार्यात झालेली वाढ लक्षणीय आहे:
शाखांची संख्या: गेल्या वर्षी ८३,१२९ असलेल्या शाखा आता ८८,९४९ झाल्या आहेत (५,८२० शाखांची वाढ).
व्याप्ती: ५१,७४० ठिकाणांवरून आता ५५,६८३ ठिकाणी संघाचे कार्य पोहोचले आहे.
दुर्गम भाग: अंदमान, अरुणाचल प्रदेश, लेह आणि दुर्गम जनजातीय क्षेत्रांतही संघाच्या शाखा सक्रिय आहेत.
सकल हिंदू संमेलने: समरसतेचा नवा अध्याय
एप्रिल अखेरपर्यंत प्रांतभरात ३ हजार, तर पुणे महानगरात ४५० संमेलने होणार आहेत. “संघाचा विस्तार केवळ शाखांपुरता मर्यादित न राहता, तो समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून समाजकार्यात विरघळून जावा, हा या संमेलनांचा मुख्य हेतू आहे. सर्व जाती-जमाती आणि पंथांना एकत्र आणून ‘समरस आणि संघटित’ समाज निर्मितीचा आमचा प्रयत्न आहे.” अशी माहिती प्रांत सरसंघचालक प्रा. सुरेश जाधव यांनी दिली.
प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव यांनी सांगितले की, केवळ संख्यात्मक वाढ नको तर समाजात गुणवत्तेचाही विस्तार व्हायला हवा. भारतीयत्व ही एक जीवनशैली असून ‘पंचपरिवर्तना’च्या माध्यमातून (कुटुंब प्रबोधन, पर्यावरण, समरसता, स्वदेशी आणि नागरिक कर्तव्य) समाजाला सकारात्मक बदलासाठी प्रेरित केले जात आहे.






