मुंबई : मराठी सिनेमा, रंगभूमी आणि हिंदी सिनेसृष्टीमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं मुंबईत निधन झाले आहे. 93 व्या वर्षां त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाबद्दल जेष्ठ अभिनेते रजा मुराद यांनी प्रतिक्रीया दिली. रमेश देव यांच निधन म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीसाठी मोठी हानी असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.
ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. अंबानी रुग्णालयात त्यांना आज सकाळी दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारा दरम्यान आज त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या जाण्याने सिनेसृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्याबद्दल बोलताना जेष्ठ अभिनेते रजा मुराद यांनी त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. ते नेहमीखूप अॅक्टिव्ह राहायचे. नेहमी फिट राहत होते. असे ते म्हणाले. “त्यांच असं निघूण जाण ही खूप दुख:द घटना आहे. माझ्या सहवेदना त्यांच्या कुटुंबासोबत आहे” ही मराठी चित्रपटसृष्टीसाठी मोठी हानी असल्याचं ते म्हणाले.
[read_also content=”येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन https://www.navarashtra.com/movies/ramesh-deo-passes-away-231594.html”]
रमेश देव यांचे सुहासिनी, अपराध, आनंद असे माईलस्टोन सिनेमे ठरले. तसंच लग्नाची बेडी, तुझं आहे तुजपाशी, प्रेमा तुझा रंग कसा ही त्यांची नाटक खूपच चालली. तसंच भावबंधन, उसना नवरा, गहिरे रंग, गुलाम, पैसे झाडाला लागतात, अकुलिना, लालबंगली या नाटकातील भूमिकांचंदेखिल कौतुक झालं. राजा गोसावी, आत्माराम भेंडे यांच्यासह त्यांची अनेक नाटकातून जोडी जुळली. रमेश देव यांचा खलनायक जितका रसिकांना भावला तितकाच भावला आनंद सिनेमामधला डॉ. प्रकाश कुलकर्णी.
– Supriya Sule (@supriya_sule) 2 Feb 2022
पडछाया, सुहासिनी, अपराध, सोनियाची पावले, देवघर, माझे घर माझी माणसं, ते माझे घर, अशा अनेक सिनेमांमधून त्यांनी मध्यवर्ती भूमिका साकाराली होती. तसेच रमेश देव यांनी मराठी सिनेमांमध्ये अनेक अभिनेत्रींसह काम केल. मात्र त्यांची अप्रतिम जोडी जमली ती सीमा देव यांच्याशी. या दोघांनी अनेक सिनेमांमधून काम केलं.
“ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्या निधनाने मराठी नाट्य-चित्रपटसृष्टीचा एक गौरवशाली अध्याय संपला आहे. देखणं व्यक्तिमत्त्व, अष्टपैलू अभिनयाच्या बळावर मराठी नाट्य-चित्रपट रसिकांच्या हृदयसिंहासनावर अनेक दशकं अधिराज्य करणारा महान कलावंत काळाच्या पडद्याआड गेला आहे. रमेश देव यांच्या अभिनयानं मराठी कलारसिकांच्या पिढ्यांना मनमुराद आनंद दिला. मराठी कलासृष्टी समृद्ध करण्याचं काम त्यांनी केलं. सीमा आणि रमेश देव यांचं वास्तवातलं तसंच पडद्यावरचं दांपत्यजीवन महाराष्ट्रासाठी आदर्शवत होतं. त्यांच्या निधनाने एक महान कलावंत, आदर्श माणूस काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्याचं निधन ही मराठी कलासृष्टीची मोठी हानी आहे. रमेश देव यांच्या कुटुंबियांच्या, रसिक चाहत्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. रमेश देव साहेबांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली…,”
-उपमुख्यमंत्री अजित पवार
“जेष्ठ अभिनेते रमेश देव यांच्या निधनामुळे भारतीय चित्रपटक्षेत्राने एक अत्यंत देखणा, शैलीदार अभिनेता गमावला आहे”, अशा शब्दांत सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. “भारतीय चित्रपट सृष्टीत विशेषतः मराठी चित्रपट क्षेत्रात कृष्णधवल चित्रपटांपासून ते आजच्या जाहिराती आणि वेब माध्यमापर्यंत सर्व माध्यमांमध्ये रमेश देव यांनी अभिनेता म्हणून आपली छाप सोडली होती. हिंदी चित्रपटांतही त्यांनी विविध भूमिका साकारून स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण केले होते. निर्माता म्हणूनही त्यांनी दर्जेदार चित्रपट दिले.त्यांनी रंगभूमीवर अभिनेता आणि निर्माता म्हणून विशेष योगदान दिले होते. त्यांच्या पत्नी जेष्ठ अभिनेत्री सीमा, यांच्यासोबत पडद्यावरील त्यांची जोडी रसिकांना विशेष भावली. भरभरून जीवन जगणारे एक जिंदादिल व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे”, असेही देशमुख यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
-अमित विलासराव देशमुख
जेष्ठ सिने अभिनेते रमेश देव आपले संपूर्ण आयुष्य फक्त अभिनयासाठी वाहीले. देव यांनी आपल्या अभिनयाने लोकांच्या मनावर काही दशके अधिराज्य गाजवले त्यामुळे त्यांच्या जाण्याने अभिनयातला देव हरपला आहे.आज चित्रपटसृष्टीतील एक देखणा तारा निखळला आहे. उत्साहाचा झरा असणाऱ्या नायकाला आज आपण मुकलो अशा शब्दात मंत्री छगन भुजबळ यांनी जेष्ठ अभिनेते रमेश देव यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
– मंत्री छगन भुजबळ