तुळजापुरातील तुळजाभवानीचे तीर्थक्षेत्र हे पूर्ण आणि आद्यपीठ मानले जाते. इथे तुळजाभवानीचे प्राचीन देऊळ असून हे महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यात वसलेले आहे. पुराणानुसार असुरांचा संहारकरून धर्माचरण आणि नीतीची पुनर्स्थापना करण्याचे कार्य देवी आईने केले आहे. स्वराज्य हिंदवीचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज भोसले यांची कुलदेवीदेखील हीच तुळजाभवानी आहे. भवानीआईच्या आशीर्वादाने महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली असून स्वतः देवी आईने छत्रपती शिवाजी महाराजांना दृष्टांत देऊन महाराष्ट्रावरील आलेल्या संकटाचे निवारण करण्यासाठी तलवार दिली होती.

तुळजाभवानी मंदिराची रचना (Design of Tulja Bhavani Temple)
या संदर्भात अशी आख्यायिका आहे की देवीचे हे देऊळ डोंगरमाथ्यावर असल्याने याचा कळस दिसत नाही. या देऊळाचे काही भाग हेमाडपंतीने बांधले आहे. नवरात्रोत्सव जरी नऊ दिवसाचा असला तरी हा उत्सव इथे एकूण एकवीस दिवस चालतो. तुळजापूर हे महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र जे समुद्र तळापासून 270 मीटर उंचीवर असलेल्या बालाघाटच्या डोंगराच्या रांगेत हे ठिकाण असे. महाराज श्रीमंत शिवाजीराजे भोसले यांची कुलदेवी असे.

चिंचपूर नाव कसे रूढ झाले? (How did Chinchpur get its name?)
तुळजापूरची मराठ्यांच्या कारकिर्दीत मंदिराची भरभराट झाली. छत्रपती शिवाजी महाराज तर भवानी मातेच्या आशीर्वाद घेतल्याशिवाय मोहिमेवर निघतच नव्हते. पूर्वी या देऊळात सर्वत्र चिंचेची झाडे असल्यामुळे या परिसराचे नाव चिंचपूर असे. नंतर आई तुळजा भवानीच्या वास्तव्यामुळे त्याचे नाव तुळजापूर असे झाले.

अशी आहे आख्यायिका (Such is the legend)
या संदर्भात एक आख्यायिका आहे की कृतयुगात कर्दभ नावाचे तपोनिष्ठ ऋषी होऊन गेले. त्यांची पत्नी अनूभुती रूपसंपन्न असून पतिव्रता होती. सुदैवाने तिला पुत्ररत्न प्राप्त झाले. परंतु त्यांचा सुखी संसार फार काळ टिकला नाही. कारण कर्दभ ऋषींनी लवकरच इहलोकीची यात्रा संपविल्यामुळे अनुभुतिने सती जाण्याचा निर्णय घेतला. परंतु अल्पवयीन पुत्राला मागे सोडून पतिसोबत सहगमन करू नये असे ऋषींनी शास्त्राचा आधार घेऊन सांगितले असता अनुभूतीने आपल्या पुत्राला गुरुगृही सोडून ती मेरू पर्वतानजिक असलेल्या मंदाकिनी नदीच्या परिसरात गेली आणि तिथे आश्रम बांधून तिने तपश्चर्या सुरू केली. तिची तपश्चर्या सुरू असताना कुकर नावाचा दैत्य तिच्या अप्रतिम सौंदर्यावर लूब्ध झाला.

दैत्याच्या मनात पापवासना निर्माण होऊन त्याने तिला स्पर्श केला. त्यामुळे तिची समाधी भंग पावली. दैत्याने काही अनुचित प्रकार करू नये म्हणून तिने आदिशक्तिचा धावा केला. खरोखरच देवी भवानी मातेच्या रूपाने त्वरित धावून आली. तिने दैत्याशी युद्ध केले. दैत्यही महिषाचे रूप घेऊन आला. तेव्हा देवीने त्रिशुळाने त्याचे शीर वेगळे केले. ही भवानी देवी वेळीच अनुभूतीच्या रक्षणासाठी त्वरित धावून आल्यामुळे तिला त्वरिता असे नाव पडले. कालांतराने त्वरिताचे-तुरजा व त्याचे पुढे तुळजा झाले. ही तुळजा भवानीची मूर्ती स्वयंभू असून तिला आठ हात आहेत.

आई तुळजाभवानी मंदिरचे प्रवेशद्वार, तुळजापूर






