मुंबई: राष्ट्रीय शेअर बाजाराचे नियमन करणाऱ्या नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडकडून (NSDL) नुकतीच तीन परदेशी गुंतवणूकदारांवर कारवाई केली. NSDL ने सील केलेल्या या तीन फंडांच्या अकाऊंटसमधून अदानी ग्रुपच्या (Adani Group) कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यात आली होती. त्यामुळे या कारवाईनंतर अदानी ग्रुपच्या समभागांचे (Shares) भाव खाली कोसळले आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, NSDLकडून काही दिवसांपूर्वी Albula इनवेस्टमेंट फंड, Cresta फंड आणि APMS इनवेस्टमेंट फंड ही तीन अकाऊंटसमधील व्यवहार तातडीने बंद करण्यात आले होते. त्यामुळे शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. विशेषत: अदानी समूहातील कंपन्यांना मोठा फटका बसला आहे.
[read_also content=”नेफ्ताली इस्त्रायलचे नवे PM; एका तपानंतर नेतान्याहू पायउतार https://www.navarashtra.com/latest-news/benjamin-netanyahu-ousted-as-israel-prime-minister-after-twelve-years-naftali-bennett-to-lead-new-government-nrvb-142015.html”]
अदानी एन्टरप्रायजेसचा समभाग १५ टक्क्यांनी घसरुन त्याची किंमत १३६१.२५ इतकी झाली. तर अदानी पोर्टस अँण्ड इकोनॉमिक झोन कंपनीचा शेअर १४ टक्क्यांनी खाली पडला. अदानी पॉवर ५ टक्के, अदानी ट्रान्समिशन ५ टक्के आणि अदानी ग्रीन एनर्जी कंपनीचा समभागाची किंमतही पाच टक्क्यांनी खाली आली.
Albula इनवेस्टमेंट फंड, Cresta फंड और APMS इनवेस्टमेंट फंड यांच्याकडून मालकी हक्कांविषयी पुरेशी माहिती न देण्यात आल्यामुळे NSDLकडून त्यांच्यावर कारवाई केल्याचे सांगण्यात येते. खाती फ्रीज झाल्यामुळे आता या तिन्ही फंडसना समभाग खरेदी-विक्रीचे व्यवहार करता येणार नाहीत. बेहिशेबी मालमत्ता प्रतिबंधक कायद्यानुसार (PMLA) या तिन्ही फंडसकडून पुरेशी माहिती देण्यात आली नव्हती. यासाठी नोटीसही पाठवण्यात आली होती. मात्र, त्यावर कोणतेही स्पष्टीकरण न आल्याने NSDLकडून ही खाती फ्रीज करण्यात आली.
[read_also content=”लग्नसोहळा सुरू असतानाच मेहुणीने सर्वांसमोर घेतला नवरदेवाचा किस आणि पुढे काय घडलं पाहा VIDEO https://www.navarashtra.com/latest-news/sister-in-law-kissed-bride-front-everyone-while-wedding-ceremony-was-going-and-then-nrvb-141773/ Corona Updates : आता मेंदूत Black Fungus घालतोय धिंगाणा; क्रिकेटच्या चेंडू एवढा ब्लॅक फंगस मेंदूतून काढण्यात डॉक्टरांना यश https://www.navarashtra.com/india-news-marathi/corona-updates-black-fungus-in-the-brain-doctors-succeed-in-removing-black-fungus-from-the-brain-as-much-as-a-cricket-ball-nrvb-141648.html”]
Shares of Adani Group companies downfall due to nsdl Major action agaisnt fpi accounts