नायजेरिया हादरलं! चालकाचं ट्रकवरील नियंत्रण सुटलं अन्...; ३० जण जागीचा ठार, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
नायजेरियातील मशिदीत आत्मघातकी हल्ला ; स्फोटात किमान ५ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (०८ फेब्रुवारी) सकाळच्या सुमारास नायजेरियाच्या कानो राज्यातील गेजावा (Gezawa) परिसरात क्कानार बार्डेयेथील महामार्गावर घडली आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक प्रवासी ट्रक आणि मालवाहतूक ट्रक गुजुंगुला रवाना झाला होता. यावेळी ट्रक चालकाचे अचानक वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रक जोरात पलटी झाला. अपघात एवढा भयंकर होता की ट्रकमधझील प्रवाशांना त्यांच्यासोबत काय घडलं याचा अंदाजही आला नाही. या अपघातात अनेक प्रवासी ट्रक खाली चिरडले गेले आहेत.
बचाव अधिकाऱ्यांच्या मते, ट्रकचा वेग आणि वाहचालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडला असल्याचे प्राथमिक तपासात आढळले आहे. तसेच नायजेरियामध्ये वाहतूक नियमांचे पालन न करणे, खराब रस्ते आणि नियमांची अंमलबजावणी होत नसल्यामुळे सतत अपघाताच्या घटना घडत आहे. कानो राज्यातील घडलेल्या अपघाताने अनेकांचा थरकाप उडाला आहे.
कानो राज्याचे गव्हर्नर कार्यलयाने याबाबत निवेदन जारी करत अपघातात ३० जणांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. जखमींनी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच निवेदनात मृतांची संख्या वाढण्याचीही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
या घटनेनंनतर स्थानिक नागरिकांनी देखील तातडीने मदतीला हातभार लावला. पोलिस आणि सरकार घटनास्थळी पोहचले असून बचाव कार्य वेगाने सुरु करण्यात आले. या घटनेवर कानोचे राज्यपाल अब्बा कबीर यूसुफ यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. तसेच मृतांच्या कुटुंबींयांप्रती संवेदना व्यक्त केली आहे. जखमींनी योग्य उपचार देण्याचे आश्वासनही त्यांनी केली आहे. या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
थायलंड-कंबोडियानंतर आता ‘या’ देशात संघर्षाची लाट ; महिला निदर्शकांवरील गोळीबारात ९ ठार
Ans: नायजेरियात रविवारी( (०८ फेब्रुवारी) सकाळच्या सुमारास नायजेरियाच्या कानो राज्यातील गेजावा (Gezawa) परिसरात क्कानार बार्डेयेथील महामार्गावर भीषण रस्ता अपघात झाला आहे.
Ans: नायजेरियातील रस्ता अपघातात ३० जणांचा मृत्यू झाला आहे.






