बरेली : उत्तरप्रदेशातील बरेलीतून (Bareli, Uttar Pradesh) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या मैत्रिणींसोबत स्कुटीवर फिरायला गेलेल्या तरुणीचं अपहरण झालं. इतकेच नाही तर आरोपींनी तिच्यावर सामुहिक बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपींनी पीडित तरुणीला आणि तिच्या मैत्रिणीला बेदम मारहाण केली. त्यानंतर पीडित तरुणीला एका अज्ञातस्थळी नेलं. मग आरोपींनी तिच्यावर सामुहिक बलात्कार केला. या प्रकरणी इज्जतनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित मुलीच्या भावाने सांगितले की, ३१ मे रोजी त्याची बहिण घराबाहेर पडली होती. स्कुटीवर बाहेर फिरायला गेली असता इज्जतनगर परिसरातील भगवानपूर धिमरी येथे पाच ते सहा जणांच्या टोळक्याने पीडित मुलगी आणि तिच्या मैत्रिणींना थांबवले. त्यानंतर त्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली.
[read_also content=”वाळवंटात निघत आहेत वाळूचे कारंजे; काय आहे नेमकं कारण, जाणून घ्या https://www.navarashtra.com/latest-news/sand-fountains-are-flowing-in-the-desert-find-out-the-exact-reason-nrvb-138620.html”]
आरोपींनी चाकूचा धाक दाखवत सर्वांना मारण्याची धमकी दिली आणि पीडित मुलीचं अपहरण केलं. यानंतर एका अज्ञातस्थळी नेत तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. या घटनेनंतर पीडित मुलगी खूपच घाबरलेली होती. तिने आपल्या कुटुंबियांना घडलेला प्रकार सांगितला नाही.
अखेर शनिवारी पीडित मुलीने घडलेला प्रकार आपल्या बहिणीला सांगितला आणि त्यानंतर सर्वांनाच एक धक्का बसला. मग पीडित मुलीने आपल्या कुटुंबियांसह पोलीस ठाण्यात दाखल होत तक्रार दाखल केली.
या घटनेप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधीक्षक रोहित सिंह सजवाण यांनी सांगितले की, पीडित तरुणीच्या तक्रारीनुसार, आरोपींच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आरोपींना पकडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
[read_also content=”तुम्ही वाहनधारक असाल तर लगेचच करा हे काम अन्यथा होईल डोक्याला शॉट; जाणून घ्या सविस्तर प्रक्रिया https://www.navarashtra.com/automobile/driving-license-link-with-aadhaar-card-otherwise-there-will-be-headaches-for-you-know-the-whole-process-nrvb-138609.html”]
she was abducted while riding a scooter They took her to an unknown place and gang raped her