मुंबई : महिलांना केंद्रस्थानी ठेऊन बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक सिनेमे दर्जेदार सिनेमे करणारे दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या प्रत्येक सिनेमाची त्यांच्या फॅन्सला उत्सुकता असते. लवकरच ते लॉकडाऊनवर आधारित सिनेमा घेऊन येणार आहेत आणि आता त्यांनी नव्या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. 18 फेब्रुवारी शुक्रवारपासून या सिनेमाच्या शूटींगचा श्रीगणेशा करण्यात आला. पहिला क्लॅप देतानाच मधुर भांडारकर यांचा तमन्नासोबतचा ‘बबली बाऊन्सर’च्या सेटवरुन फोटो व्हायरल होत आहे.या सिनेमात अभिनेत्री तमन्ना भाटिया प्रमुख भूमिका साकारत आहे.
मधुर भांडारकर यांनी बबली बाऊन्सरची घोषणा आपल्या फेसबुकवर एक फोटो शेअर करून केली आणि कॅप्शनमध्ये लिहलं की, माझा हा 15 वा सिनेमा. सांगण्यासाऱखी अजून एक अनोखी कथा. कधीही न अनुभवलेल्या बाऊन्सरच्या जगात तुमचं स्वागत आहे. एक धम्माल, विनोदी आणि हदयस्पर्शी कथा. तमन्ना भाटियाला या सिनेमात पाहा यापूर्वी कधीही न पाहिलेल्या अवतारात.