सौजन्य- इंस्टाग्राम
कल्की 2898 AD बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी करत आहे. प्रेक्षकांनी या चित्रपटाला डोक्यावर घेतले आहे. आता स्टार कलाकारही चित्रपटाचे कौतुक करताना दिसत आहेत. यात श्रध्दा कपूरनेही बिग बींची इस्टाग्रामवर अनोख्या अंदाजात पोस्ट करत कौतुक केले आहे.
क्या नोर्थ, क्या साऊथ, क्या वेस्ट… सारा सिनेमा एक तरफ… अमिताभ बच्चन एक तरफ असे लिहिलेली पोस्ट केली आहे तसेच त्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये अमिताभ बच्चन अपने आप में ही एक युनीव्हर्स है असे लिहित अमिताभ बच्चन यांना टँग केले आहे. अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाला श्रध्दा कपूरने दिलेली दाद प्रेक्षकांनाही आवडली असून या पोस्टच्या खाली तिच्या चाहत्यांनी अनेक कमेंटस् केल्या आहेत.
अभिनेता अभिषेक बॅनर्जीने तिच्या पोस्टवर कंमेट कर लिहिले आहे की ते बाप ऑफ ऑल बाप, एका चाहत्याने कमेंटमध्ये लिहिले आहे की ते “द्रोणाचार्य का पुत्र अश्वत्थामा” अस म्हणताना तुला शहारा आला का? एका चाहत्याने तसेच एकाने कमेंट केली की रिश्ते में वो सबके बाप नही लगते तोफिर भी वो है तो शेहंशा ही. अशा असंख्य कमेंटस् श्रध्दाच्या पोस्टवर चाहत्यांनी केल्या आहेत.
कल्कीचे बॉक्स ऑफिसवरचे यश
कल्की 2898 AD च्या दुस-या दिवसाच्या जगभरातील कलेक्शनची ताजी माहिती चित्रपटाच्या निर्मात्यांनी अधिकृत X खात्यावर दिली आहे, त्यानुसार चित्रपटाने आतापर्यंत 298.5 कोटी रुपयांची कमाई केली आहे. पहिल्या दिवसाच्या तुलनेत शुक्रवारी चित्रपटाच्या कमाईत 107 कोटींची रेकॉर्डब्रेक वाढ झाली आहे. आजची आणि रविवारची कमाई यापेक्षा जास्त असण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 2024 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये कल्की सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरत आहे. त्यामुळे सिनेमा उद्योग तसेच थिएटरमध्येही नवचैतन्याचा माहोल आहे.
प्रभास, दिपिका आणि बिग बी अमिताभ बच्चन स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाचे कथानक विष्णूच्या येणाऱ्या कल्की अवतारावर आधारित आहे. त्यामुळे भविष्यातील कथानक अस त्यामुळे त्या जगात विज्ञान आणि तंत्रज्ञानातील आश्चर्यकारक गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत.