मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी(businessman mukesh ambani) यांच्या निवासस्थानाच्या परिसरात कारमध्ये स्फोटके ही दहशतवादी संघटनेकडून ठेवल्याचे समोर आल्यानंतर एनआयएने या प्रकरणी चौकशीची व्याप्ती वाढविली आहे. या चौकशीत दहशतवादी संघटनांनीच स्फोटके ठेवल्याचा बनाव मंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंह(Param Bir Singh) यांच्या सूचनेनुसारच रचण्यात आला होता, या निष्कर्षाप्रत एनआयए पोहोचल्याचे वृत्त असून परमबीर यांच्या सूचनेनुसारच वाझेने इतरांच्या मदतीने तसा बनाव रचल्याचा संशय आहे. त्यामुळे परमबीर यांची पुन्हा चौकशी करण्याचा निर्णय तपास यंत्रणेने घेतला असल्याचे समजते.
वाझे, प्रदीप शर्मा आदी आरोपींसह तिहार जेलमधील दहशतवादी इंडियन मुजाहिद्दीनचा हस्तक तेहसीन अख्तर याच्याकडे केलेल्या तपासातून ही माहिती समोर आली आहे. 25 फेब्रुवारीला कार मायकेल रोडवर स्कॉर्पिओमध्ये जिलेटिनच्या 20 कांड्या व धमकीचे पत्र आढळले होते. वाझेने त्याची लिंक दहशतवादी संघटनेशी जोडली. तथापि मनसुख हिरेनने अटक करण्यास नकार देताच त्याचाही काटा काढण्यात आला.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम गँगशी संबंधित सुभाष सिंग ठाकूरने वाझेच्या सांगण्यावरून मध्यस्थीच्या माध्यमातून यूएई येथील सर्व्हरवरून सोशल मीडियावर मेसेज पाठवला होता. त्यासाठी मोबाइल फोन तिहार जेलमधील इंडियन मुजाहिद्दीनचा हस्तक अख्तरकडे पोहोचवण्यात आला. याची सर्व जबाबदारी तेहसीन घेईल याची पूर्ण सेटिंग केली होती. पण, याचदरम्यान या प्रकरणाचा तपास एनआयएकडे वर्ग झाल्याने त्यांचा प्लान फसला.
[read_also content=”आत्महत्येपूर्वी पूजा मद्यधुंद होती! व्हिसेरा अहवालात मोठा खुलासा; राठोड यांच्या अडचणी कायम https://www.navarashtra.com/latest-news/pooja-was-drunk-before-committing-suicide-big-revelation-in-the-viscera-report-rathores-problems-persist-nrvk-165091.html”]
[read_also content=”‘या’ मंदिरात गेल्यावर होतो मृत्यू; संशोधक व वैज्ञानिक मृत्युच्या भितीने इथे जात नाही https://www.navarashtra.com/latest-news/pluto-is-the-ancient-temple-of-god-in-turkey-if-anyone-enters-this-temple-he-is-killed-nrvk-164606.html”]
[read_also content=”सायन्स फॅक्ट; कच्चे सॅलड खाल्ल्याने अनेक आजारांना निमंत्रण https://www.navarashtra.com/latest-news/science-fact-eating-raw-salads-invites-many-ailments-nrvk-164609.html”]
[read_also content=”19 वर्षीची पोरगी ६७ वर्षाच्या म्हाताऱ्यासोबत पळून गेली आणि… https://www.navarashtra.com/latest-news/19-year-old-girl-married-to-old-man-sit-will-investigate-nrvk-164601.html”]
[read_also content=”किराणा दुकानातही मिळणार वाईन; पवारांची ईच्छा उद्धव ठाकरे करणार पूर्ण https://www.navarashtra.com/latest-news/wine-will-also-be-available-at-grocery-stores-uddhav-thackeray-will-fulfill-pawars-wish-nrvk-164211.html”]
[read_also content=”विकृताने अचानक अनोखळी महिलेला घट्ट मिठी मारली अन्… गजबजलेल्या दादर रेल्वे स्थानकातील धक्कादायक प्रकार https://www.navarashtra.com/latest-news/the-pervert-suddenly-hugged-a-strange-woman-and-shocking-type-at-the-crowded-dadar-railway-station-nrvk-163725.html”]






