• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Crime »
  • Ahilyanagar News Second Shooting Incident In Ghodegaon

Ahilyanagar News: घोडेगाव परिसरात गोळीबाराची दुसरी घटना! एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी

अहिल्यानगरमधील घोडेगाव येथे गुरुवारी (दि.12 फेब्रुवारी) दिवसाढवळ्या झालेल्या गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 14, 2026 | 09:09 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • घोडेगाव येथे गोळीबाराची दुसरी घटना
  • या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू
  • नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
गुरुवारी सायंकाळी घोडेगाव येथे झालेल्या भीषण गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. जुन्या वैमनस्यातून झालेल्या या घटनेत ३३ वर्षीय नितीन विलास शिरसाठ यांचा मृत्यू झाला, तर सूरज फुलमाळी हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर पुणे येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ही घटना सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत घोडेगावातील एका खासगी दवाखान्यात घडली. दोन्ही गट आमनेसामने आल्यानंतर सुरुवातीला शाब्दिक वाद झाला. त्यानंतर वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि गावठी कट्ट्यांतून गोळीबार करण्यात आला. आरोपींनी नितीन शिरसाठ यांच्यावर बेछूट गोळीबार केला. त्यांना तत्काळ नगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

सूरज फुलमाळी याला प्रथम अहिल्यानगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले. दरम्यान, अहिल्यानगरमधील रुग्णालय परिसरात दोन्ही गटांचे समर्थक आमनेसामने आल्याने काही काळ तणाव निर्माण झाला; मात्र पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

Vasai Virar Crime News: आयुष्य इतकं स्वस्त झालं आहे का? वसई विरार परिसरात एकाच दिवशी 6 जणांची आत्महत्या

या प्रकरणी मृत नितीन शिरसाठ यांच्या पत्नी स्वाती नितीन शिरसाठ (रा. वांजोळी, ता. नेवासा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोनई पोलिस ठाण्यात गुलाब सादिक फुलमाळी, सूरज फुलमाळी, आकाश अण्णा फुलमाळी, कृष्णा यल्लाप्पा फुलमाळी व भारत यल्लाप्पा फुलमाळी यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील दुसरी गोळीबाराची घटना

गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यात घडलेली ही दुसरी गोळीबाराची घटना आहे. काही दिवसांपूर्वी अमळनेर येथे गोळीबार झाला होता. तसेच सोनई-कांगोणी रस्त्यालगत वडघुले वस्तीवर एका तरुणाचा खून झाल्याची घटना ताजी असतानाच घोडेगावातील गोळीबारामुळे नागरिकांमध्ये भीती वाढली आहे.

पोलिसांसमोर मोठे आव्हान

या घटनेचा तपास जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी व स्थानिक पोलिस करीत आहेत. घोडेगावातील टोळीयुद्ध पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरत आहे. अवैध धंद्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.

गावठी कट्ट्यांचा वाढता वापर चिंताजनक

नेवासा तालुका गावठी कट्ट्यांसाठी कुप्रसिद्ध होत असल्याची चर्चा आहे. राज्याबाहेरून अवैध शस्त्रांची तस्करी होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दोन ते तीन हजार रुपयांत सहज उपलब्ध होणारे गावठी कट्टे गुन्हेगारीला खतपाणी घालत असल्याचे चित्र आहे. वाळूतस्करी, चंदनतस्करी यांसारख्या अवैध धंद्यांमधून मिळणाऱ्या पैशामुळे गुंड प्रवृत्तीच्या तरुणांची संख्या वाढत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

नागरिकांनी मोक्याच्या ठिकाणी अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, अवैध शस्त्रसाठ्यावर कठोर कारवाई करणे आणि गुन्हे अन्वेषण पथकाला अधिक बळ देणे, अशा उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणी केली आहे.

Web Title: Ahilyanagar news second shooting incident in ghodegaon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2026 | 09:09 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • crime news

संबंधित बातम्या

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये बालाजी उत्सव संपन्न ;बालाजी देवस्थान ट्रस्टची २० वर्षांची परंपरा
1

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये बालाजी उत्सव संपन्न ;बालाजी देवस्थान ट्रस्टची २० वर्षांची परंपरा

धक्कादायक! इंदापूरमध्ये तरुणाचे अपहरण; तब्बल 20 तास छळ केला अन्…
2

धक्कादायक! इंदापूरमध्ये तरुणाचे अपहरण; तब्बल 20 तास छळ केला अन्…

Jhamkhed Crime: मुलगी पळवून नेल्याची माहिती दिल्याच्या रागातून तिघांकडून एकाची हत्या
3

Jhamkhed Crime: मुलगी पळवून नेल्याची माहिती दिल्याच्या रागातून तिघांकडून एकाची हत्या

शेतात काम करणाऱ्या महिलेवर हत्याराने हल्ला; दोन जण आले अन्…
4

शेतात काम करणाऱ्या महिलेवर हत्याराने हल्ला; दोन जण आले अन्…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Ahilyanagar News: घोडेगाव परिसरात गोळीबाराची दुसरी घटना! एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी

Ahilyanagar News: घोडेगाव परिसरात गोळीबाराची दुसरी घटना! एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी

Feb 14, 2026 | 09:09 PM
Pulsar Lovers साठी आनंदाची बातमी! May 2026 पर्यंत येऊ शकतात 8 नवीन आणि अपडेटेड बाईक्स

Pulsar Lovers साठी आनंदाची बातमी! May 2026 पर्यंत येऊ शकतात 8 नवीन आणि अपडेटेड बाईक्स

Feb 14, 2026 | 08:46 PM
सुरक्षित बाजारपेठेसाठी ग्राहक जागरूकता आणि कंपन्यांची उत्तरदायित्वाची भूमिका महत्त्वाची! Anil Diggikar यांचे मत

सुरक्षित बाजारपेठेसाठी ग्राहक जागरूकता आणि कंपन्यांची उत्तरदायित्वाची भूमिका महत्त्वाची! Anil Diggikar यांचे मत

Feb 14, 2026 | 08:31 PM
Middle East मध्ये येणार मोठं वादळ? ट्रम्प यांनी इराणच्या दिशने धाडलं ‘मृत्यूचं विमान’, अणु करारावरुन नवा अल्टीमेटम

Middle East मध्ये येणार मोठं वादळ? ट्रम्प यांनी इराणच्या दिशने धाडलं ‘मृत्यूचं विमान’, अणु करारावरुन नवा अल्टीमेटम

Feb 14, 2026 | 08:20 PM
Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Feb 14, 2026 | 08:20 PM
1 रुपयांच्या शॅम्पूने करा गंजलेला ताव साफ, दोन मिनिटांतच कोणत्याही मेहनतीशिवाय मिळेल नव्यासारखी चमक

1 रुपयांच्या शॅम्पूने करा गंजलेला ताव साफ, दोन मिनिटांतच कोणत्याही मेहनतीशिवाय मिळेल नव्यासारखी चमक

Feb 14, 2026 | 08:15 PM
Vasai Virar Crime News: आयुष्य इतकं स्वस्त झालं आहे का? वसई विरार परिसरात एकाच दिवशी 6 जणांची आत्महत्या

Vasai Virar Crime News: आयुष्य इतकं स्वस्त झालं आहे का? वसई विरार परिसरात एकाच दिवशी 6 जणांची आत्महत्या

Feb 14, 2026 | 08:05 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Feb 14, 2026 | 07:15 PM
Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Feb 14, 2026 | 07:09 PM
Train Viral Video :  शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Train Viral Video : शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Feb 14, 2026 | 07:03 PM
Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Feb 14, 2026 | 06:55 PM
Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Feb 14, 2026 | 03:32 PM
CHIPLUN : कवी साहित्यिकांचा कसा आहे व्हॅलेंटाईन डे

CHIPLUN : कवी साहित्यिकांचा कसा आहे व्हॅलेंटाईन डे

Feb 14, 2026 | 03:28 PM
Thane News :  पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय  केळकर पुन्हा आक्रमक

Thane News : पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय केळकर पुन्हा आक्रमक

Feb 13, 2026 | 08:15 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.