संग्रहित फोटो
सोलापूर : सोलापूर शहरात विनाहेल्मेट (Without Helmet) दुचाकीवरून फिरणाऱ्या १७ पोलीस कर्मचाऱ्यांची वाहने शहर वाहतूक पोलीस शाखेच्या पोलिसांनी जप्त केली आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ५०० रुपये दंड आकारण्यात आला आहे. पोलिसांकडून पोलिसांच्या गाड्यावर कारवाई करण्यात आल्याने अनेक पोलीस कर्मचारी गोंधळात पडले आहेत.
शहर पोलीस दलातील सर्वच पोलिसांना शुक्रवारपासून हेल्मेटसक्ती करण्यात आली आहे. लोकांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून विना हेल्मेट घालणाऱ्या खाकी वर्दीधारकांवर कारवाई करून सोलापूर पोलिसांनी एक आदर्श घालून दिला आहे. यापुढेही ही अशीच कारवाई सुरु राहणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी दिली.