मुंबई : हिंदी आणि मराठी सिनेसृष्टी गाजवणारी एक अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. (sonali kulkarni) सोनालीने नेहमीच चोखंदळ भूमिका केल्या आहेत. त्यामुळे तिच्या आगामी सिनेमाची नेहमीच प्रेक्षकांना उत्सुकता असते. सोनालीदेखील आपल्या प्रत्येक सिनेमाची माहिती सोशल मीडियातून शेअर करते. नुकतंच सोनालीने तिच्या फेसबुकवरून ‘तिचं शहर होणं’ या आपल्या आगामी सिनेमाचा पहिला पोस्टर शेअर केला.
हा फोटो शेअर करताना सोनालीने कॅप्शनमध्ये लिहलं की, ‘सादर करत आहोत.
‘तिचं शहर होणं’. (Tich Shahar hona) ह्या आमच्या चित्रपटाचं पहिलं पोस्टर. हा चित्रपट स्वीडनच्या बोडेन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (Boden international film festival) डिसेंबर 2021 मधील विजेता म्हणून घोषित करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर महोत्सवातील अंतिम १२ चित्रपटांमध्ये देखील त्याची निवड झालेली आहे.