जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून Elon Musk यांना ओळखले जाते. Elon Musk साऊथ आफ्रिकेचे investor, engineer आणि businessman आहेत आणि त्यांना genius entrepreneur नावानेही ओळखले जाते. कोणतेही काम करण्यासाठी त्यांना पूर्णपणे तयारी करावी लागते. कोणत्याही यशस्वी व्यक्तीसाठी त्यांच्या दररोजचे नियम खूप महत्त्वाचे असतात. परंतु Elon Musk यांच्या दिवसाची सुरूवात नक्की कशी होते, त्यांच्या यशस्वी होण्यामागचं नक्की कारण काय? हे आज आपण जाणून घेणार आहोत.
Elon Musk आपल्या कामाच्या बाबतीत खूप गंभीर असतात. ते कामासाठी आपलं खाणं-पिणं पण सोडून देतात. अनेकवेळा ते रात्रीच्या वेळी प्रोडक्शनच्या फ्लोरवरच झोपून जातात. Elon Musk यांची सकाळ जवळपास ७ वाजता सुरू होते. मिळालेल्या माहितीनुसार, ते फक्त ६ ते ६.३० तासचं झोपतात. जर त्यांची झोप पूर्ण नाही झाली की, त्यांच्या कामगिरीवर त्यांचा प्रभाव पडतो. झोपून उठल्यानंतर आणि अंघोळ झाल्यानंतर ते सकाळी कॉफीचा स्वाद घेत आनंद व्यक्त करतात. बहुतेक करून ते खूप व्यस्त आणि घाई गडबडीतच असतात. काही दिवसांसाठी त्यांना सकाळचा नाश्ता सुद्धा सोडावा लागतो. ज्यादिवशी ते नाश्ता करतात, त्याच्यामध्ये ते फक्त ऑमलेट खातात.
Reddit AMA च्या एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं की, शॉवर घेणे हे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण शॉवर घेतल्याशिवाय त्यांची पुढील कामचं होत नाहीत. सकाळी उठल्यानंतर दररोज शॉवर घेणं हे त्यांना दररोज आगामी आव्हानासाठी तयार करते. त्यानंतर ते आपल्या मुलांना शाळेत सोडतात आणि आपल्या कामाला निघून जातात.
[read_also content=”भारताची लोकशाही मजबूत आणि बळकट, माझा लोकशाहीवर पूर्ण विश्वास : सुनील केदार https://www.navarashtra.com/latest-news/indias-democracy-is-strong-and-strong-says-sunil-kedar-nrms-197255.html”]
Elon Muskयांनी केलल्या दाव्यानुसार, आठवड्याला ते ८० ते १०० तास काम करतात. यामध्ये त्यांचं संपूर्ण लक्ष हे स्किलसेट डिझाईन आणि इंजीनिअरिंग या गोष्टींवर असते. SpaceX मध्ये ९० टक्के वेळ त्यांची डिझाईनच्या कामात निघून जाते. त्याचप्रमाणे टेस्ला मध्ये ६० टक्के इतका वेळ ते आपल्या कामात देतात.
Elon Musk मल्टी टास्कर आहेत. त्यामुळे ते आपले फोन आणि ई-मेल सुद्धा अटेंड करत नाहीत. जास्त व्यस्त असल्यामुळे मस्क यांना न्यूट्रिशनवरती जास्त लक्ष देता येत नाहीये. ते दुपारचं जेवण सुद्धा मिटिंगच्या नंतर करतात. वेळेला ते जास्त महत्त्व देतात. त्यामुळे ते शक्यतो अनावश्यक मिटिंग करणं टाळतात. २०१८ मध्ये एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं की, मस्क आठवड्यामध्ये १२० तास काम करतात. त्यांची मुलं जन्माला आल्यानंतर त्यांनी सर्वाधिक वेळ त्यांच्या मुलांना देणं सुरू केलं होतं. त्यांनी आपल्या मुलाचं नाव X Æ A-12 ठेवलं आहे.