कोल्हापूरातील रस्ते पावसामुळे खराब झाल्याचे कारण प्रशासनातर्फे देण्यात येते. हा बेजाबदारपणा आहे. रस्त्यांची अवस्था अत्यंत गंभीर आहे, असे याचिकाकर्ते उदय नारकर म्हणाले. सध्या अत्यंत अशास्त्रीय पद्धतीने केली जाणारी कोल्हापूर शहरातील रस्त्यांची डागडुजी आक्षेपार्ह असल्याचे सांगण्याचा प्रयत्न सुनावणी दरम्यान अॅड. असीम सरोदे यांनी केला. परंतु रस्त्यांचे कामकाज एकएक पायरी नीट ठरवून होऊ द्या व आपण सविस्तर विचार नंतर करू, असे न्या. मकरंद कर्णिक म्हणाले.
या जनहित याचिकेतील आरोपांवर उत्तर देण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिका, कोल्हापूर जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, कोल्हापूर जिल्हाधिकारी, नगर विकास मंत्रालयाने पुन्हा अवधी मागून घेतला त्यामुळे पुढील सुनावणी 18 डिसेंबरला ठेवण्यात आली आहे. याचिकाकर्त्यांनी याचिकेत काय म्हटले आहेरस्त्यांच्या या अत्यंत दर्जाहीन परिस्थितीमुळे, मणक्याचे दुखणे, कमरेचे दुखणे, गाड्यांच्या देखभाल खर्चामध्ये प्रचंड वाढ आणि धुळीच्या लोटांमुळे हवेच्या प्रदूषणामध्ये कमालीची वाढ झाली आहे. याशिवाय, खराब रस्त्यांमुळे होणाऱ्या अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली असून, वाहतूक कोंडी, त्यामुळे खर्च होणारे अधिकचे इंधन हे सर्व आता नागरिकांच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेले आहे, असे कोल्हापूरकरांचे दुःख याचिकेतून मांडण्यात आल्याचे अॅड.. असीम सरोदे यांचे सहकारी वकील अॅड. श्रीया आवले, अॅड. योगश सावंत आणि अॅड. सिद्धी दिवाण यांनी सांगितले.
कुठेही, कशाही पद्धतीने रस्ते उकरायला दिली जाणारी परवानगी आणि विविध युटिलिटीच्या कामांसाठी उकरलेले रस्ते यामुळे कोल्हापूर शहर हे एखाद्या उद्ध्वस्त झालेल्या शहरासारखे भासू लागले आहे. सामान्य माणसांना स्पॉडिलायसिस, सर्दी, डोळेदुखी असे आजार होत आहेत. उपननगरातील रस्त्यांबाबत तर यापेक्षा गंभीर परिस्थिती आहे, याकडे याचिकेत लक्ष वेधण्यात आले आहे.
Ans: कोल्हापूर उच्च न्यायालयातील न्या. मकरंद कर्णिक आणि न्या. अजित कडेठाणकर यांनी प्रशासनाने रस्त्यांच्या समस्येकडे सकारात्मक पाऊल उचलण्यास सुरुवात केली असल्याचे नमूद केले आणि दुरुस्तीची कामे नियमबद्ध पद्धतीने चरणांनुसार करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
Ans: रस्त्यांची गुणवत्ता गेल्या अनेक वर्षांपासून खालावत आहे. प्रशासनाकडून पावसाचे कारण देत वारंवार बेजबाबदारपणा केला जातो. दुर्लक्षामुळे शहराची परिस्थिती "उद्ध्वस्त" शहरासारखी झाली आहे. डागडुजी अशास्त्रीय आणि नियमबाह्य पद्धतीने केली जाते.
Ans: कोल्हापूर शहरातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था, प्रशासनाचे दुर्लक्ष, तसेच खराब दर्जाच्या दुरुस्तीमुळे निर्माण झालेल्या आरोग्य, वाहतूक व पर्यावरण समस्यांकडे न्यायालयाचे लक्ष वेधणे हा या PILचा उद्देश आहे.






