चेंडू आणायला गेला अन् सगळचं संपलं..., क्रिकेट खेळताना 13 वर्षाच्या शाळकरी मुलाचा मृत्यू
शाळेला सुट्टी असल्याने आईला विचारून 13 वर्षीय विद्यार्थी त्याच्या मित्रांसोबत उत्साहात खेळत होता. परंतु क्रिकेट खेळण्याच्या नादात विद्यार्थ्यांने आपला जीव गमवावा लागला. मयत मुलाचे नाव अफान असिफ बागवान असून तो फक्त १३ वर्षांचा होता. या घटनेनंतर परिसरात गोंधळ उडाला आणि नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
खेळ सुरू असताना त्यांचा चेंडू शेजारील हनुमंत खांडेकर यांच्या इमारतीच्या टेसेवर गेला. म्हणून अफान टेरेसवर चेंडू घेण्यासाठी गेला. याच इमारतीवरून विमानतळाला वीजपुरवठा करणारी 11000 व्होल्टची हाय-टेन्शन पॉवर लाईन जाते. या चिमुकल्यांच्या त्याकडे लक्ष नाही गेलें.
टेरेसच्या अगद दीन-दोन फूट अंतरावरून जाणाऱ्या या विद्युत वाहिनीचा त्याचा संपर्क येताच, त्याला जोरदार विजेचा धक्का बसला. विजेचा धक्का इतका जोरदार होता की दुर्दैवाने या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेमुळे अनेक प्रश्नचिन्हे निर्माण झाली आहेत.
अफान हा वि.सा. खांडेकर प्राथमिक शाळेत इयत्ता सातवीत होता. शिक्षकांच्या संपामुळेशुक्रवारी शाळेला अघोषित सुट्टी असल्याने, सकाळी ११:३० च्या सुमारास एअरपोर्ट रोडजवळील मोकळ्या परिसरात क्रिकेट खेळण्यासाठी गेला. खेळताना मारलेला चेंडू शेजारच्या हनुमंत खांडेकर यांच्या बंगल्याच्या टेरेसवर गेला. बॉल घेण्यासाठी अफान टेरेसवर चढला. अचानक इमारतीच्या अगदी दीड-दोन फूट अंतरावरून जाणाऱ्या 11000 व्होल्ट (11 केव्ही) क्षमतेच्या उच्चदाब विद्युत वाहिनीचा त्याच्या गळ्याला स्पर्श झाला. जोरदार विद्युत धक्का बसताच तो खाली कोसळला आणि जागीच मृत्यू पावला.
दरम्यान, कोल्हापूरमध्ये एक भीषण अपघात झाला. कोल्हापूर-गारगोटी रस्त्यावर चुये फाट्याजवळ व्हॅन आणि दुचाकीमध्ये समोरासमोर झालेल्या धडकेत आज दोघांचा मृत्यू झाला. चालक शिवाजी शंकर कोळी (४५ रोड कागल) आणि व्हॅन चालक अतुल अरविंद पाटील (३० रोड गुडाळ, रोड राधानगरी) अशी त्यांचे नावे आहेत. गजानन प्रभाकर चौगले (रा. तारळे), अनिल शिवाजी जाधव (रा. धामोड) आणि दुचाकीवरीवाल वैशाली शिवाजी कोळी आणि त्यांची नात सुप्रिया चेतन दळवी (३) जखमी झाले. इस्पुर्ली पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.






