राज्य शासनाने शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अनेक चुकीचे निर्णय घेतल्याने याच्या विरोधात तसेच जुनी पेन्शन योजना चालू करावी, शालाबाह्य कामे लावू नयेत, टीईटीची सक्ती करू नये, यासह इतर मागण्यांसाठी आज सांगली जिल्ह्यातील विविध शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट असा मूक मोर्चा काढण्यात आला.आम्हाला शिकवू द्या, शिक्षकांची पदे कमी करण्यात येऊ नयेत, शासनाने याबाबतीत लवकरात लवकर ठोस निर्णय घ्यावा अन्यथा राज्यभरात मोठ्या प्रमाणात शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आंदोलन करतील अशा तऱ्हेचा इशारा देण्यात आला आहे.