श्री दत्तात्रय यांच्या जन्मोत्सवा निमित्त शहरातील रामानंद नगर येथील साई मंदिर संस्थानमध्ये ०४ डिसेंबर पासून श्री गुरु चरित्र ग्रंथ पारायण सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. आज श्री दत्तात्रय जन्मोत्सवाचे औचित्य साधत श्री गुरू चरित्र ग्रंथाची समाप्ती झाली, सकाळी साडे नव ते साडे अकरा या वेळेत किर्तन झाले त्यानंतर नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या माजी महापौर शीला भवरे व किशोर भवरे यांच्या उपस्थितीत दत्त जन्म सोहळा पार पडला. यावेळी मंदिर संस्थान चे अध्यक्ष श्री देशपांडे यांच्या सह पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर माजी महापौर शीला किशोर भवरे यांच्या परिवारातर्फे उपस्थितीत असलेल्या हजारो भक्तांना महाप्रसाद वाटप करण्यात आला.