सोलापूर : स्वातंत्र्य लढ्यात अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या त्याग व बलिदानामुळे देश स्वतंत्र झाला. सोलापूर शहराचा स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास फार मोठा आहे. चार हुतात्म्यांनी आणि इतरांनीही देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली, असे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले.
सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीने ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त बलिदान चौक येथील हुतात्मा स्तंभ येथे सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी आमदार प्रणिती शिंदे, माजी आमदार निर्मला ठोकळ, विश्वनाथ चाकोते, शहर अध्यक्ष प्रकाश वाले, गटनेते चेतन नरोटे, कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार, महिला अध्यक्ष हेमा चिंचोळकर, नगरसेवक विनोद भोसले, शिवा बाटलीवाला, हाजी तौफिक हत्तुरे, आरिफ शेख, भीमाशंकर टेकाळे, अनुराधा काटकर, वैष्णवी करगुळे, बाबा करगुळे, गणेश डोंगरे, उदयशंकर चाकोते, देवेंद्र भंडारे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.