बाबर आझम(फोटो-सोशल मीडिया)
Babar Azam autograph controversy : पाकिस्तानी फलंदाज बाबर आझम एका वादात सापडला आहे. ऑस्ट्रेलियन भूमीवर बाबर आझमने असे काही केले आहे ज्यामुळे त्याला भारतीय चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. घडले आहे की, बिग बॅश लीग सामन्यादरम्यान बाबर आझमने भारतीय संघाच्या एका चाहत्यावर स्वाक्षरी केली. यावेळी चाहत्याने टीम इंडियाची जर्सी घातली होती आणि बाबरकडून त्याच जर्सीवर स्वाक्षरी करण्यात आली होती. बाबर आझमने चाहत्यासोबत सेल्फी देखील काढला. आता हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हेही वाचा : ‘कर्णधार होण्यास लायक नाही…’ शुभमन गिलबद्दल इंग्लंडच्या ‘या’ माजी दिग्गज खेळाडूच्या विधानाने उडाली खळबळ
पाकिस्तानचा खेळाडू बाबर आझमच्या एका ऑटोग्राफमुळे तो आता चांगल्याच वादात सापडला आहे. काही भारतीय चाहते सोशल मीडियावर या घटनेला भारतीय संघाच्या जर्सीचा अपमान म्हणू लागले आहेत. यासाठी बाबर आझमवर तीव्र टीका होऊ लागली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव आधीच वाढला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाने त्यात अधिकची भर पडणार असल्याचे बोलले जात आहे. आता पीसीबी बाबर आझमवर कारवाई देखील होण्याची शक्यता आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी बाबर आझमला पाकिस्तानी संघातून वगळण्यात आले होते. तो आता बिग बॅश लीगमध्ये सिडनी सिक्सर्सकडून खेळताना दिसत आहे. आतापर्यंत त्याची कामगिरी निराशाजनक अशीच राहिली आहे. बाबर आझमला चार सामन्यांमध्ये फक्त ७१ धावाच करता आल्या आहेत. या दरम्यान त्याची सरासरी १७.७ आहे. बाबरचा स्ट्राईक रेट देखील ११० इतका आहे. चारपैकी तीन डावांमध्ये तो दुहेरी आकडा गाठू शकलेला नाही.
हेही वाचा : AUS vs ENG, Ashes 2025 : ICC चा मोठा दणका! बॉक्सिंग डे खेळपट्टीला ‘असमाधानकारक’ रेटिंग
बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान दोघे देखील श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत खेळताना दिसणार नाहीत. पाकिस्तानच्या १५ सदस्यीय संघात शादाब खानचे पुनरागमन झाले असून सलमान अली आघा संघाचे नेतृत्व करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सलमान अली आघा (कर्णधार), अब्दुल समद, अब्रार अहमद, फहीम अशरफ, फखर जमान, ख्वाजा नाफे, मोहम्मद नवाज, मोहम्मद सलमान मिर्झा, मोहम्मद वसीम ज्युनियर, नसीम शाह, साहिबजादा फरहान, सैम अयुब, शादाब खान, उस्मान खान, उस्मान तारिक.






