विद्यापीठाच्या राजकारणात नवा बदल, आचारसंहितेनंतर प्र-कुलगुरूंची होणार नियुक्ती
रेल्वे भरती मंडळाने (RRB) एकूण 22,000 पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे. ही भरती पॉइंट्समन, असिस्टंट, ट्रॅक मेंटेनर (ग्रेड IV) आणि विविध तांत्रिक विभाग (अभियांत्रिकी, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल) या पदांसाठी घेण्यात येणार आहे.
याभरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय?
उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळातून 10वी (मॅट्रिक) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तांत्रिक पदांसाठी आयटीआय प्रमाणपत्र किंवा राष्ट्रीय अप्रेंटिसशिप प्रमाणपत्र (एनएसी) असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाऊ शकते.
वयोमर्यादा किती
१ जानेवारी २०२६ रोजी उमेदवारांचे वय १८ ते ३३ वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गासाठी (ओबीसींसाठी ३ वर्षे आणि एससी/एसटीसाठी ५ वर्षे) वयात सूट दिली जाईल.
निवड प्रक्रिया
अर्ज कसा कराल?
उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन करावा लागेल. उमेदवारांनी www.rrbapply.gov.in ला भेट देऊन नोंदणी करावी. सामान्य आणि ओबीसी उमेदवारांसाठी शुल्क ₹५०० आहे. सीबीटीमध्ये उपस्थित राहिल्यानंतर ₹४०० परत केले जातील. तर एससी/एसटी, महिला आणि अपंग व्यक्तींसाठी शुल्क २५० रुपये आहे.
भरतीसाठी महत्वाच्या तारखा कोणत्या?
Ans: ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 21 जानेवारी 2026 पासून सुरू होईल.
Ans: CBT परीक्षा, PET, कागदपत्र पडताळणी व मेडिकल टेस्टद्वारे निवड होईल.
Ans: अधिकृत वेबसाइट www.rrbapply.gov.in वरून अर्ज करावा लागेल.






