संग्रहित फोटो
अतुल बोऱ्हाडे यांच्या पत्नी प्रियंका बोऱ्हाडे (वय २९, रा. रामनगरी, सिन्नर) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, अतुल यांनी संबंधित आठ जणांकडून वेळोवेळी पैसे घेतले होते. घेतलेल्या रकमेची परतफेडही त्यांनी केली होती. मात्र, संबंधितांकडून ‘आम्हाला फक्त व्याजाची रक्कम मिळाली असून मुद्दल अद्याप बाकी आहे,’ असे सांगत पैशांसाठी वारंवार तगादा लावला जात होता. प्रत्यक्ष भेटून, फोनद्वारे तसेच मेसेज करून अतुल यांना त्रास दिला जात होता. काही जण त्यांच्या घरी येऊन शिवीगाळ व दमदाटी करीत असल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. या सततच्या त्रासामुळे अतुल मानसिक तणावाखाली होते. संबंधितांच्या जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप पत्नीने केला आहे. त्यानुसार सिन्नर पोलिसांनी आठ जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे, शिवीगाळ आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमकुमार दांडेकर या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
हे सुद्धा वाचा : अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध, मामीने विरोध केला अन्…; नागपुरातील घटनेनं खळबळ
लाखो रुपयांच्या आर्थिक व्यवहाराची चर्चा
सचिन संभाजी गीते, नलिनी सचिन गीते, हर्षल गोळेसर, सचिन धनगर, सौरभ खेडलेकर, मीरा खोपे, उज्ज्वला लोखंडे आणि माधुरी सागर शिंदे (सर्व रा. सिन्नर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. यापैकी नलिनी गीते वगळता उर्वरित सात जणांना पोलिसांनी तब्येत घेतले आहे. सिन्नर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतुल बोऱ्हाडे यांचा होलसेल फटाके विक्रीचा व्यवसाय होता. त्यांनी संबंधित व्यक्तींकडून व्याजाने पैसे घेतल्याची सिन्नरमध्ये चर्चा आहे. मुद्दल आणि व्याज मिळून हा आर्थिक व्यवहार जवळपास ५० लाख रुपयांच्या घरात असल्याचेही बोलले जात आहे. घेतलेल्या रकमेची वेळेत परतफेड करता न आल्याने तसेच पैसे देणाऱ्यांकडून वारंवार तगादा सुरू असल्याने अतुल तणावाखाली होते, अशी चर्चा शहरात आहे.
Ans: अतुल रामदास बोऱ्हाडे (वय ३४) असे आत्महत्या केलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. ते सिन्नरमधील प्रसिद्ध होलसेल फटाके व्यापारी होते.
Ans: आर्थिक व्यवहारातून होणारा कथित मानसिक छळ, पैशांच्या वसुलीसाठी वारंवार होणारा तगादा, शिवीगाळ आणि धमक्यांमुळे अतुल यांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या पत्नी प्रियंका बोऱ्हाडे यांनी केला आहे.
Ans: या प्रकरणात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, नलिनी गिते यांना वगळता सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.






