Drought confirmed in Sambhajinagar district ( संभाजीनगर जिल्ह्यात दुष्काळावर शिक्कामोर्तब ) फोटो सौजन्य AI
आता महसूल विभागाने केलेल्या पैसेवारीच्या मोजणीतूनही उत्पन्नात मोठी घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात खरिपाचे पेरणी क्षेत्र ७ लाख ९९ हजार ५९४ हेक्टर आहे. त्यापैकी यंदा ७ लाख ५४ हजार ९५२ हेक्टरवर पेरणी झाली होती. मात्र, जून महिन्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने पेरण्या लांबल्या. त्यानंतर सर्वदूर पाऊस झालाच नाही. २७ गावांत पैसेवारीची मोजणी केली नाहीछत्रपती संभाजीनगर तालुक्यातील १९ आणि पैठण तालुक्यातील ४ गावे महापालिका व पालिका हद्दीत समाविष्ट असल्याने त्यांची पैसेवारी जाहीर करण्यात आलेली नाही.
गंगापूर तालुक्यातील एकूण २२६ गावांपैकी ४ गावे जायकवाडी प्रकल्पात संपादित झाल्याने, तेथील उर्वरित २२२ गावांचीच पैसेवारी जाहीर करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. तालुकानिहाय स्थितीजिल्ह्यात खरिपासाठी १,३५४ गावांत पैसेवारी मोजली. सर्व गावांची सरासरी पैसेवारी ४५.७२ पैसे निघाली आहे. वैजापूर, खुलताबाद आणि कन्नड या तीन तालुक्यांमध्ये सर्वांत कमी ४४.०० पैसेवारी नोंदवली गेली आहे. गंगापूर तालुक्यात सर्वाधिक ४८.७ पैसेवारी नोंदवली आहे. खरीप, रब्बी हगांमांत पैसेवारी मोजण्याची प्रत्यक्ष पद्धतपीक कापणी प्रयोगः सरपंच, शेतकरी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांच्या समक्ष निवडलेल्या प्लॉटमधील पिकाची कापणी व मळणी करून ओल्या धान्याचे वजन केले जाते. हे धान्य उन्हात वाळवून त्याचे वजन मोजले जाते, यावरून पिकाचे हेक्टरी सरासरी उत्पन्न काढतात.
हंगामाच्या मध्यावर पिके शेतात उभी असताना तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक शिवारात जाऊन पिकांची प्रत्यक्ष पाहणी करतात. पावसाचे प्रमाण, पिकांची वाढ आणि कीड-रोगांचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन ‘नजरअंदाज पैसेवारी’ निश्चित केली जाते.
छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील १९ आणि पैठण तालुक्यातील ४ गावे महापालिका व पालिका हद्दीत समाविष्ट असल्याने त्यांची पैसेवारी जाहीर करण्यात आलेली नाही. गंगापूर तालुक्यातील एकूण २२६ गावांपैकी ४ गावे जायकवाडी प्रकल्पात संपादित झाल्याने, तेथील उर्वरित २२२ गावांचीच पैसेवारी जाहीर करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.






