भारत आणि पाकिस्तान (IND Vs PAK) यांच्यात २४ ऑक्टोबरला टी-२० वर्ल्डकपचा (T-20 World Cup) पहिला सामना होणार आहे. यामध्ये पाकिस्तानने सामना खेळण्याआधीच १२ खेळाडूंची नावे जाहीर केली आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने (Captain Babar Azam) पत्रकार परिषद घेऊन संघातील १२ खेळाडूंची घोषणा केली आहे.
पाकिस्तान संघाने आपल्या १२ खेळाडूंमध्ये बाबर आझम(कर्णधार), मोहम्मद रिझवान,फखर जमान, मोहम्मद हफीज, शोएब मलिक, आसिफ अली,हैदर अली, इमाद वसीम, शादाब खान, हसन अली, शाहीन शाह अफरीदी आणि हारिस इउफला जागा देण्यात आली आहे. परंतु संघाचा माजी कर्णधार सरफराज अहमदला शेवटच्या १२ मध्ये स्थान देण्यात आलेलं नाहीये.
टी-२० वर्ल्डकपसाठी सरफराज अहमदला पहिल्या पाकिस्तानच्या संघात जागी मिळालेली नव्हती. परंतु त्यांनंतर त्याला १५ सदस्यीय संघामध्ये समावेश करण्यात आला होता. सरफराज संघातील मोठ्या खेळाडूंपैकी एक खेळाडू आहे. अशातच पाकच्या संघाला मैदानावर त्यांच्या प्रदर्शनाची कमी जाणवू शकते.
[read_also content=”Pak विरूद्धच्या सामन्यात Hardik Pandya खेळणार का? कोहलीने केला मोठा खुलासा… https://www.navarashtra.com/latest-news/indian-captian-virat-kohli-reveal-about-hardik-pandya-in-ind-vs-pak-match-nrms-195373.html”]
घरच्या मैदानात क्रिकेटमध्ये चांगलं प्रदर्शन करणारा शोएब मलिकला शेवटच्या अंतिम १२ खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आला आहे. मलिकने राष्ट्रीय संघासाठी शेवटचा सामना एक वर्षापूर्वी खेळला होता. २००७ मध्ये आतापर्यंत शोएबने ५ टी-२० वर्ल्डकपचे सामने खेळले होते. तसेच त्याच्याजवळ २२ वर्षाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव सुद्धा आहे. टी-२० वर्ल्ड कपमध्ये २८ सामन्यांमधून मलिकने ३२.११ च्या सरासरीत ५४६ धावा बनवल्या आहेत.