प्रतिकात्मक फोटो
नागपूर (Nagpur). बाजारात काही भाज्या चिकनपेक्षाही महाग झाल्या आहेत (Nagpur Vegetable Price). नागपुरात सध्या चिकनचा दर 200 रुपये किलो आहे. पण, मेथी, फरसबी, शेवगा, वाल या भाज्या किरकोळ बाजारात 250 रुपये किलो दराने विकल्या जात आहेत. (Nagpur Vegetable Price Hike Became More Expensive Than Chicken Due To Damage By Heavy Rainfall)
आवक कमी झाल्याने सध्या नागपूरच्या किरकोळ बाजारात चिकनपेक्षाही भाजीपाला महागल्याची स्थिती आहे. पावसामुळे भाजीपाल्याचे नुकसान झालंय. त्यामुळे सर्वच भाज्यांच्या दरात दुप्पटीपेक्षा अधिक वाढ झालीये. याचा ग्राहकांच्या बजेटवर मोठा परिणाम होतोय.
[read_also content=”बच्चू कडू चक्क बनले युसुफखाॅं पठाण; वेशांतर करून शिरले शासकीय कार्यालयात, अधिकाऱ्यांची उडाली धांदल https://www.navarashtra.com/latest-news/bachchu-kadu-guerrilla-warfare-disguised-office-bushes-officers-fired-nrat-145495.html”]
भाज्या दर प्रति किलो
मेथी 250 रुपये किलो
फरसबी 250 रुपये किलो
टोमॅटो 50 रुपये किलो
कोथिंबीर 120 रुपये किलो
पत्ताकोबी 80 रुपये किलो
दोडका 120 रुपये किलो
भेंडी 120 रुपये किलो
शेवगा 250 रुपये किलो
फ्लावर 120 रुपये किलो
वाल 250 रुपये किलो
वांगी 80 रुपये किलो
भाजीपाल्याची आवक कमी
राज्यभर सुरु असलेल्या पावसामुळे मुंबईत भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे बाजारभाव वाढले आहेत. मुंबईत पुणे, सातारा, दक्षिणेकडील राज्य, नाशिक आणि इतर ठिकाणावरुन भाजीपाल्याची आवक सुरु आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्यामुळे दर वाढले आहेत.
भाज्यांनी शंभरी पार केली आहे. इंधन दरवाढ शंभरी पार केल्यानंतर भाज्याही महाग झाल्या आहेत आणि पावसामुळे आवक पण कमी झाली असल्यामुळे याचा परिणाम गृहींनींच्या बजेटवर झाला आहे. लोकांच्या खिशाला कात्री बसत आहे. तसेच विक्रेत्यांनाही 30 ते 40 टक्के फटका सहन करावा लागत आहे.
भाजी दर प्रति किलो
मटार 100 रुपये किलो
भेंडी 40 रुपये किलो
फरसबी 100 रुपये किलो
पडवळ 60 रुपये किलो
गवार 60 रुपये किलो
कोबी 28 रुपये किलो
आलं 36 रुपये किलो
वांगी 48 रुपये किलो
शिमला 32 रुपये किलो
शेंगा 40 रुपये किलो