Pro Kabaddi Season 8: प्रो कबड्डी लीग २०२१ चा विजेता ठरवण्यासाठी जास्त वेळ उरलेला नाही. PKL 8 चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले हे २५ फेब्रुवारीला सर्वांना कळेल. सोमवारी झालेल्या एलिमिनेटर सामन्यात बंगळुरू बुल्सने गुजरात जायंट्सचा पराभव केला, तर यूपी योद्धाने पुणेरी पलटणचा पराभव करून उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले. या हंगामात १२ पैकी ८ संघांनी आपला प्रवास पूर्ण केला आहे, तर उर्वरित चार संघ विजेतेपदाच्या लढतीत राहिले आहेत.
पाटणा पायरेट्स आणि बंगळुरू बुल्सने याआधी प्रो कबड्डीचे विजेतेपद पटकावले आहे. मात्र, दबंग दिल्ली आणि यूपी योद्धा मधून कोणताही संघ जिंकला तर या लीगला नवा चॅम्पियन मिळेल. पाटणा पायरेट्सने सीझन ३, ४ आणि सीझन ५ मध्ये सलग तीन विजेतेपद जिंकले. त्यानंतर बुल्सने सीझन ६चे विजेतेपद पटकावले. दबंग दिल्लीला सलग दुस-यांदा विजेतेपदाच्या लढतीत स्थान मिळवायचे आहे, तर यूपी योद्धा आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवत पाटणाला पराभूत करू इच्छित आहे.
दोन्ही उपांत्य फेरीतील विजेते संघ २५ फेब्रुवारीला विजेतेपदाच्या लढतीत आमनेसामने येतील. हा सामना रात्री ८.३० वाजता सुरू होईल, जो तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि हॉटस्टारवर थेट पाहू शकता.