नवी दिल्ली : गुगल पे, पेटीएम, फोन-पे आणि भीम यासारख्या युपीआय प्लॅटफॉर्मवर (UPI Platform) दर महिना सरासरी १.२२ अब्ज डॉलर्स म्हणजेच १२२ कोटी रुपयांचे व्यवहार (Transations) होत आहेत. गेल्या पाच वर्षांचा विचार केला तर यात ५५० टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.
२०१६-१७ मध्ये डिजिटल व्यवहार (Digital Transations) हे १००४ कोटी रुपयांचे होते, ते २०२०-२१ मध्ये ५५५४ कोटी रुपयांपर्यंत पोहचले आहेत. २०२१ सालाचा विचार केला तर २०२०च्या तुलनेत यात १०० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
सध्याच्या काळात अगदी भाजी मार्केट, किराणा दुकाने, नाव्ह्यांच्या, चहाच्या दुकानातही डिजिटल पेमेंट होत आहेत. क्यूआर कोडच्या सहाय्याने होणाऱ्या युपीआय पेमेंटमुळे यात गेल्या काही वर्षांत मोठी वाढ झाली आहे. मार्च २०२० मध्ये २.०६ लाख कोटी रुपयांचे युपीआय ट्रान्झेक्शन्स झाले होते, मार्च २०२१ चा विचार केल्यास यात ५.०४ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. येत्या पाच वर्षांत या डिजिटल पेमेंटच्या स्वरुपातही मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
[read_also content=”अशा प्रेमाचा नेहमीच गळा घोटला जातो, रेल्वे रुळांवर पडलं होतं त्याचं शव; खिशातील सुसाईड नोट वाचताच अनेकांना झाले अश्रू अनावर https://www.navarashtra.com/latest-news/man-end-his-life-as-parents-not-accepting-love-of-different-religion-in-up-nrvb-146044.html”]
स्मार्टफोनच्या जगात बायोमेट्रिक टेक्नॉलॉजी नवी बाब राहिलेली नाही. स्मार्टफोन उघडण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या या बायोमेट्रिक तंत्रज्ञानाचा उपयोग लवकरच डिजिटल पेमेंटसाठी होणार आहे. यामुळे पिन लक्षात ठेवण्याची गरज पडणार नाही, तसचं इतर कुठल्याही माध्यमापेक्षा ही पद्धत जास्त सुरक्षित ठरण्याची शक्यता आहे. यामुळे फसवणुकीच्या प्रकारांना मोठ्या प्रमाणात आळा बसू शकेल.
अलेक्साशी कुठल्याही विषयावर गप्पा मारणारी पिढी आता नवी नाही. अलेक्साकडून गमतीशीर उत्तरे मिळवण्यासाठी प्रयत्न होणाऱ्या या तंत्रज्ञानाचा उपयोग लवकरच डिजिट पेमेंटसाठीही करण्यात येणार आहे. प्रत्येकाच्या आवाजातील वेगळेपण लक्षात घेऊन, याद्वारे आगामी काळात व्यवहार होतील. गुगल पे आणि अमेझॉनने यावर लक्ष केंद्रीत केले आहे. हा प्रयोग यशस्वी झआल्यास डिजिटल पेमेंट अधिक सोपे होण्याची शक्यता आहे.
[read_also content=”फक्त रात्रच नाही तर ‘ही’ आहे लैंगिक संबंध (SEX) ठेवण्याची योग्य वेळ; जाणून घ्या सविस्तर https://www.navarashtra.com/latest-news/not-just-at-night-but-this-is-the-best-and-worst-time-of-physical-relation-nrvb-146069.html”]
योत्या काळात मोबाईऐवजी आपला चेहराच, आपले बँक अकाऊंट आणि पासवर्ड होण्याची शक्यता आहे. हे प्रत्यक्षात आल्यास कॅश, कार्ड, पिन, मोबाईल या सगळ्यातूनच सुटका होऊ शकेल. चीनमध्ये सध्या अशा पद्धतीने व्यवहार सुरु झाले आहेत.
This is New India 550 percent increase in digital payments in the last five years with voice and face to face transactions in the next five years






