रीलच्या नादात मृत्यूशी खेळ! बाईकच्या टायरला आग लावली अन्...; पुढं जे घडलं पाहून काळजाचा ठोका चुकेल, VIDEO VIRAL (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर एक धोकादायक स्टंटबाजीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक अल्पवयीन आणि एका तरुणाने बाईकच्या टायरला आग लावण्याच्या स्टंट केला आहे. बाईकला आग लावताच एवढा भयंकर भडका उडाला आहे की पाहून थरकापच उडेल. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की एक तरुण बाईकवर बसला असून त्याच्या जवळ एक मुलगा हातात माचिसची काडी घेऊन उभा आहे. यानंतर त्याने माचिसची काडी पेटवली आणि बाईकच्या मागच्या टायरवर फेकले आहे. टायरला आग लागली आहे. तर बाईकवरील तरुण अॅक्सिलेटर फिरवला आहे. टायरल जोरात गोल फिरत असल्याने अगीचा भडका उडाला आहे. तरुणांच्या या धोकायदायक कृत्याने सोशल मीडियावर संतापाचे वातावरण आहे. सुदैवाने कोणत्याही प्रकारचा अपघात झालेला नाही. परंतु चूकीनही आग तिथे असलेल्या घराला आग लागली असती.
व्हायरल व्हिडिओ
क्या आग 🔥 के साथ ऐसा करना सही है?? भले ये मजाक में कर रहा हो लेकिन उससे कोई बड़ा हादसा हो सकता है।। क्या कहना चाहेंगे इसके इस बदमाशी पर ?? pic.twitter.com/x7B8x6FnQB — Salaar (@adnanadviser) February 4, 2026
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @adnanadviser शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारोंनी पाहिले असून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. एका नेटकऱ्याने अशी मस्ती महागात पडू शकते, दुसऱ्या एका नेटकऱ्याने आयुष्यभर पश्चात्ताप करावा लागले असे म्हटले आहे. या व्हिडिओने सध्या सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






