सातारा : सातारा जिल्हा बँकेसाठी (Satara District Bank Election) अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तीन जागा बिनविरोध झाल्या. यामध्ये खरेदी-विक्री संघातून आमदार मकरंद पाटील आणि महाबळेश्वर विकास सेवा सोसायटी मतदारसंघातून राजेंद्र रजपुरे, आणि कृषी प्रक्रिया मतदारसंघातून शिवरूप राजे खर्डेकर हे बिनविरोध निवडून आले आहेत.
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सोमवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत होती. त्यामुळे मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाले आहेत. परंतु, शेवटच्या दिवसापर्यंत खरेदी-विक्री मतदारसंघ, महाबळेश्वर विकास सेवा सोसायटी आणि कृषी प्रक्रिया मतदारसंघातून प्रत्येकी एक अर्ज दाखल झाला आहे.
त्यामुळे खरेदी-विक्री मतदारसंघातून मकरंद पाटील, महाबळेश्वर विकास सेवा सोसायटीतून राजेंद्र राजपुरे आणि कृषिप्रक्रिया मतदारसंघातून शिवरूप राजे खर्डेकर हे बिनविरोध निवडून आले आहेत. आता उर्वरित 18 संचालकांसाठी माघारीपर्यंत राजकीय हालचाली गतिमान होणार आहेत.