फोटो सौजन्य- iStock
प्रत्येकाला वाटते की, आपल्याला मोठ्या पॅकेजची नोकरी असली पाहिजे. त्यामुळे आपण आपल्या गरजा भागवू शिवाय आरामदायी आणि आनंदी जीवन जगू शकतो. आज अनेक तरुणांकडे लाखो पॅकेज असणारी नोकरी आहे. त्यांची जीवनशैली ही त्यामुळे प्रचंड वेगळी आहे. अशी लाखो रुपयांच्या पॅकेजची नोकरी मिळण्यास भाग्य लागते तसेच ती नोकरी टिकवून ठेवण्यासाठी मेहनतही घ्यावी लागते. जर आम्ही तुम्हाला सांगितल की एका तरुणीची 76 लाख पॅकेज असणारी नोकरी गेली मात्र तिला त्याचे दु:ख होण्यापेक्षा आनंद झाला आहे. तर तुम्ही नक्कीच विश्वास ठेवणार नाही मात्र अस खरंच झाले आहे.
24 वर्षाची असलेल्या Cierra Desmaratti हिला तब्बल 76 लाख पॅकेज असणारी नोकरी मिळाली होती. मात्र अचानक एक दिवशी एचआर ने तिला सांगितले की तुला नोकरीवरुन कमी करण्यात आले आहे. त्यावेळी सिएरा दु:खी न होता आनंदी झाली आणि म्हणाली की, माझ्या जीवनात यापेक्षा चांगल काही होऊच शकत नाही. मीडया रिपोर्टनुसार, सिएरा ही जगातील प्रमुख ग्लोबल कंसल्टिंग फर्म डेलॉइटच्या शिकागोतील कार्यालयात एक्चुरियल अॅनालिस्ट म्हणून काम करत होती. तिचे वार्षिक पॅकेज अमेरिकन डॉलरमध्ये 90 हजार डॉलर्स म्हणजेच भारतीय रुपयात 76 लाख रुपये होते. डेलॉइटमध्ये नोकर कपातीमध्ये तिचे नाव होते आणि तिची नोकरी गेली.
कंपनीची कार्यसंस्कृती, आजारपण, वजनात घट
आता सिएरा फार खूश आहे नोकरी गेल्याबद्दल तिने सांगितले की, डेलॉइटच्या अतिव्यस्त कार्यसंस्कृतीमुळे मला चांगले वाटत नव्हते. मला असे वाटायचे की, माझ्या सहकाऱ्यांशी जुळवून घेण्यासाठी माझे व्यक्तीमत्व वाढ न करता अजून कमी करावे लागेल. त्याच दरम्यान, मला नोकरीवरुन कमी करण्यात आले. त्यानंतर मला कळले की मला करिअरमधून खरोखर काय हवे आहे.
डेलॉइटमध्ये 11 तास काम करावे लागत असे. या अतिव्यस्त कार्यसंस्कृतीमुळे आणि कामावरील दबावामुळे ती शारीरिक आणि मानसिकरित्या आजारी पडू लागली. या कालावधीत तिचे वजन 9 किलोने कमी झाले. यावरुनच तिच्यावर कामाचा झालेला परिणाम दिसून येतो.
वर्क लाइफ बॅलेन्स
नोकरीवरुन कमी केल्यानंतर ती आनंदी होती कारण तणावपूर्ण कार्यसंस्कृतीतून तिला मुक्तता मिळाली होती. त्यानंतर तिच्याकडे केवळ 2 आठवड्यांकरिताचे पैसे होते. त्याच काळात तिने नोकरीचा शोध सुरु केला नोकरी मिळण्यास 2 महिने लागले मात्र तिच्या मनाजोगी नोकरी मिळाली. सध्या सिएरा ही ट्रान्स अमेरिकेत एक्चुरियल अॅनालिस्ट म्हणून रिमोट जॉब करत आहे. या नोकरीवर ती घरातूनच काम करत असल्याने वर्क लाइफ बॅलेन्स साधत आहे.